Navratri 2023 fashion looks  esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023 : नवरात्रीमध्ये हटके लूक हवाय? मग ‘या’ एथनिक आऊटफिट्सची घ्या मदत

या ९ दिवसांमध्ये खास लूक करण्यावर महिलांचा भर असतो.

Monika Lonkar –Kumbhar

Navratri 2023 : नवरात्रौत्सवाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत असतात.विशेषत: महिला नवरात्रीची आतुरतेने वाट पाहत असतात. या ९ दिवसांमध्ये सर्वत्र देवीची पूजा, अर्चना केली जाते. या दरम्यान, सर्वत्र उत्साही वातावरण पहायला मिळते.

आता नवरात्रौत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. विविध कपडे, दांडिया, देवीच्या पूजेचे सामान इत्यादी अनेक गोष्टींची लगबग बाजारपेठांमध्ये पहायला मिळत आहे.महिला खास करून या ९ दिवसांमध्ये विविध रंगांचे आऊटफीट्स परिधान करतात. त्यामध्ये मग, ड्रेस, साड्या, चनिया-चोली आणि घागरे यांचा समावेश आढळून येतो.

या ९ दिवसांमध्ये खास लूक करण्यावर महिलांचा भर असतो. या नवरात्रीला तुम्ही विविध प्रकारचे आऊटफिट्स ट्राय करून खास लूक करू शकता. आज आम्ही तुम्हाला नवरात्री स्पेशल फॅशन लूकबद्दल काही टिप्स देणार आहोत.

पारंपारिक साडी

साडी हा असा आऊटफीट आहे की, जो तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी ट्राय करू शकता. साडी शिवाय आपल्या भारतीय महिलांची फॅशन अपूर्ण आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. नवरात्रौत्सवात महिलांची साडीला नेहमीच पहिली पसंती असते.

या नवरात्रीला तुम्ही लाल, ऑरेंज, पिंक किंवा रॉयल ब्लू इत्यादी रंगांच्या साड्या परिधान करू शकता. राजस्थानी बांधनी साडीचा पॅटर्न सध्या ट्रेंडमध्ये आहे. या पॅटर्नच्या साड्या तुम्ही ट्राय करू शकता. साडीमुळे तुम्हाला एलिगंट लूक मिळेल, यात काही शंका नाही.

मल्टीकलर आणि फ्लोरल प्रिंटचे घागरे

घागऱ्यांना नेहमीच डिमांड असते. मग, कोणताही कार्यक्रम असला तरी सुद्धा घागऱ्यांना महिलांची नेहमीच पसंती असते. नवरात्रीमध्ये पूजेला किंवा खास दांडिया नाईटसाठी तुम्ही मल्टीकलरचे घागरे किंवा फ्लोरल प्रिंटचे घागरे ट्राय करू शकता.

या घागऱ्यांना विशेष मागणी आहे. या घागऱ्यांवर हटके ज्वेलरी ट्राय करायला विसरू नका, मग बघा तुमचा लूक कसा वेगळा ठरतो ते.

लॉंग स्कर्ट आणि टॉप

साडी, घागरे हे ऑप्शन्स जर तुम्हाला बोअर वाटत असतील तर लॉंग स्कर्ट आणि टॉप हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट असू शकतो. नवरात्रीमध्ये खास आणि वेगळे दिसायचे असल्यास तुम्ही विविध रंगांचे, प्रिंटचे लॉंग स्कर्ट परिधान करू शकता. त्यावर, मग मॅचिंग होणारे टॉप ट्राय करू शकता. हा लूक तुम्ही दांडिया नाईटसाठी बिनधास्त करू शकता. या टॉपवर तुम्ही गरज पडल्यास श्रग्स किंवा विविध प्रकारचे जॅकेट्स ही परिधान करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT