Navratri 2023
Navratri 2023  esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023 : नवव्या माळेला आई अंबाबाईची श्रीदक्षिणामूर्ती रूपातील पूजा

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 : श्रीदक्षिणामूर्ती हे भगवान शिवांचे साकार, ज्ञानस्वरूप रूप आहे. सर्व आगमशास्त्रे तंत्रविद्यांमध्ये श्रीदक्षिणामूर्ती हे आदिगुरु- संप्रदाय प्रवर्तक आहेत. यांच्या उपासनेने सर्व विद्या, रोग निवारण, मोक्षप्राप्ती होते.

दुर्गतिकारक अविद्या व माया यांचा नाश करणारे, अर्थात मृत्युचक्र नष्ट करणारी देवता म्हणून यांचे मुख दक्षिण दिशेला असते. श्रीदक्षिणामूर्ती हे वटवृक्षाखाली ध्यानमग्र असून चतुर्भुज आहेत.

ज्ञान हे निरंतर चिरतरुण असते, म्हणून ज्ञानमय दक्षिणामूर्ती नित्य तरुण असतात, तर ज्ञान घेणारा विद्यार्थी 'वृद्ध' होतो; 'वृद्धाः शिष्याः' म्हणून त्यांच्या सभोवती ज्ञानार्थी वृद्ध असतात.

अश्विन शुद्ध नवमी पूजा श्री दक्षिणामूर्तीरूपिणी माता

दक्षिणामूर्ति हे भगवान शंकरांचे एक रूप या रूपामध्ये भगवान शंकर हे वटवृक्षाच्या छायेखाली ललितासनात व्याघ्रांबर किंवा मृगाजीनावरती बसलेले असून त्यांचा उजवा हात व्याख्यान मुद्रेत, उजव्या वरच्या हातात जपमाळा, डाव्या वरच्या हातामध्ये अग्नी किंवा दिवटी आणि डावा खालचा हात हा वरद मुद्रेत दाखवला जातो. त्यांच्या पायाखाली अपस्मार नावाचा राक्षस असतो.

भगवान शंकरांचे हे रूप दक्षिणेकडे तोंड करून असून ते अज्ञानीजनांना मार्गदर्शन करणारे विद्याप्रदायक रूप मानले जाते. त्यांच्या हातातील व्याख्यान मुद्रा ही सृष्टीला अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी, एकाग्रतेचे प्रतीक म्हणून जपमाळ तर अज्ञानाचा अंधकार दूर करणारा अग्नी आणि वरद मुद्रा ही भक्त जनांना धीर देणारी मुद्रा म्हणून ओळखली जाते.

दक्षिण भारतामध्ये दक्षिणामूर्ती शिवाची उपासना ज्ञानप्राप्तीसाठी केली जाते. शिवाच्या पायाखाली असलेला अपस्मार नावाचा राक्षस हा भ्रम किंवा अज्ञान याचे प्रतीक आहे

भगवान दक्षिणामूर्ती आपल्या शिष्यांना मौनाने उपदेश करीत असून, त्यातूनच शिष्यांच्या सर्व शंकांचे समाधान होत आहे. आद्य शंकराचार्यांचे श्रीदक्षिणामूर्ति स्तोव सुप्रसिद्ध आहे.

श्रीदेवी माता ही आदिशक्ती असून सर्व सृष्टी, विद्या कला अध्यात्माची जननी आहे. म्हणून ज्ञानरूपा श्रीदेवी मातेतील दक्षिणामूर्ती देवता तत्त्वाचे दर्शन घडवणारी आजची महापूजा आजची पूजा श्रीपूजक सचिन ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी साकारली आहे.

दक्षिणामूर्ती आपल्या शिष्यांना मौनाने उपदेश करीत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT