Navratri 2023 esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023 : उपवासाला ‘नो भात, नो पुलाव’; असा बनवा नवरात्री स्पेशल फराळी पुलाव!

झटपट होणारी आणि पोट भरणारी ही रेसिपी आहे

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 : नवरात्रीच्या नऊ दिवसात अनेक लोक उपवास करतात. काही लोक धार्मिक भावना म्हणून तर काही लोक डायटिंग म्हणून उपवास करतात. वर्षभर ज्यांना ताटात सगळे पदार्थ पहायची सवय झाली असेल अशांसाठी हे नऊ दिवस उपाशी राहणं सोप्प नसतं.

हे उपवास करण्यात महिलावर्गाची संख्या जास्त असते.उपवास असले तरी इतरांसाठी सर्व स्वयंपाक तयार करून मग उपवासाचा पदार्थ बनवला जातो. बरं काही स्त्रियांना विकनेस असतो तेव्हा त्या स्वत:साठी काही न बनवताच उपाशी राहणे पसंत करतात.  

तुम्हीही उपवास करणार असाल तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. कारण, झटपट होणारी आणि पोट भरणारी ही रेसिपी आहे. बरं ज्या लोकांना भात खायला आवडतो पण नऊ दिवस भातापासून दूर राहणं शक्य नसेल अशा लोकांसाठी फराळी पुलाव बेस्ट असणार आहे.  

नवरात्रीच्या उपवासाच्या नऊ दिवसांमध्ये पुलाव हा एक चवदार आणि आरोग्यदायी पर्याय असू शकतो. ते बनवणे खूप सोपे आहे. (Recipe)

पुलावसाठीचे साहीत्य

वरीचे तांदूळ (एक वाटी), शेंगदाणे (पाव वाटी), बटाटे (२), जिरे (एक चमचे), तूप (दोन चमचे), हिरव्या मिरच्या (४), कोथंबिर, पाणी (२ वाट्या) मीठ (चवीनुसार)

फराळी पुलावची कृती

  1. प्रथम बटाटे उकडण्यास ठेवा. आणि तांदूळ धुवून पाण्यात भिजवत ठेवा.

  2. बटाटे कापून तव्यावर हिरव्या मिरच्या घालून तळून घ्या. आता कढईत तूप गरम करून शेंगदाणे परतून घ्या. नंतर जिरे टाका आणि नंतर बटाटे घालून मिक्स करा.

  3. आता या मिश्रणात तांदूळ करून घाला. यानंतर पाणी, मीठ आणि शेंगदाणे घालून उकळी येऊ द्या. 

  4. भात शिजल्यावर गॅस बंद करून हिरव्या कोथिंबिरीने सजवा. तुमचा फराळी पुलाव तयार आहे तो तूम्ही गरमागरम सर्व्ह करा. (Healthy Food)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT