Navratri 2023 esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023 : घरच्यांनी मारलं, बंद करून ठेवलं, तरी घाबरली नाही, आज बनली देशातली पहिली ट्रान्सजेंडर जज जोयिता मंडल

‘जेवण मागितलं तर हॉटेलवाल्यानं भीक देऊन हाकललं’

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 : आज सर्वांच्या घरी घटस्थापना मोठ्या उत्साहात पार पडली आहे. घरोघरी नवरात्री वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. या नऊ दिवसात महिलांच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. पण, त्यांचाच एक महत्त्वाचा भाग असलेल्या महिला ट्रान्सजेंडर्सना आपण विसरतो.

अर्धनारीनटेश्वर म्हणून ज्याला पुजलं जातं. त्यांचेच प्रतिक असलेल्या तृतियपंथीयांना मान-सन्मानासाठी अद्याप लढावं लागतं. हा लढा केवळ समाजासोबत नाहीतर कुटुंबातील लोकांसोबत सुरू होतो.

कुटुंब आणि समाजाला झुगारून काही लोक यशस्वी होतात. तर काहीजण मध्येच हा संघर्ष सोडून देतात. कुटुंबाच्या छळाला कंटाळलेल्या कित्येक तृतियपंथीयांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. पण, जे या लढ्यात यशस्वी होतात ते नक्कीच उच्चस्थानी पोहोचतात.

आजही आपल्या समाजात ट्रान्सजेंडर लोकांबद्दल पुराणमतवादी विचार आहेत. परंतु जोयता मंडल हिने ट्रान्सजेंडर होऊनही तिचा आत्मविश्वास कधीच गमावला नाही. पश्चिम बंगालच्या ३० वर्षीय जोयिता मंडलची ओळख देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर जज अशी आहे.

जोयिता मंडल यांचा न्याय मागण्यापासून तो न्याय देणाऱ्या उच्चपदी नियुक्त होण्याचा प्रवास सोपा नव्हता. तो लढा होता स्वत: च्या कुटुंबासोबत आणि समाजातील विकृत मानसिकतेविरूद्ध.

एका मुलाखतीत जोयिताने सांगितले की, मी बाहेरून मुलगा होते पण आतून मुलगी होते. त्यामुळे मी नेहमी स्वत:ला एक सामान्य मुलगी समजत असे. म्हणून एका नवरात्रीत सजून-धजून बाहेर पडण्याचा निर्णय मी घेतला. यासाठी मी ब्युटी पार्लरमध्ये गेले आणि तयार झाले. पण या गोष्टीचा कुटुंबियांना राग आला. त्यांनी माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला. (Navratri 2023)

हि मारहाण अशा स्वरूपाची होती की मी चार दिवस बेडवरून उठू शकले नाही. मला अन्न पाण्यापासून दूर ठेवलं अन् माझ्यावर उपचारही केले गेले नाहीत. ती तशीच विव्हळत होते. मला ती खोली आजही आठवते. जेव्हा मी कोर्टात अशा काही घटनांबद्दल ऐकते, असं जोयिता सांगतात.

जेव्हा मी कॉलेजला जायचे तेव्हा सगळे माझी चेष्टा करायचे. त्यामुळे मी माझे शिक्षण सोडले. २००९ मध्ये मी घर सोडण्याचा निर्णय घेतला, कुठे जायचे याचा काही ठावठिकाणा नव्हता. माझ्याजवळ एक रुपयाही नव्हता.

मी दिनाजपूरला पोहोचले तेव्हा पैसे नसल्याने हॉटेलमध्ये राहण्याचा प्रश्नच नव्हता. तेव्हा मी बसस्थानक आणि रेल्वे स्टेशनवर रात्र काढली. एका हॉटेलात जेव्हा मी जेवण मागितलं. तेव्हा त्या मालकाने मला जेवणही दिले नाही. उलट भिक दिली आणि माझ्यासाठी दुवा दे आणि इथून चालती हो असं सांगितलं.

‘जेवण मागितलं तर हॉटेलवाल्यानं भीक देऊन हाकललं’

अनेक गोष्टींचे अनुभव गाठिशी बांधत असतानाच. मी 2010 पासून ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांसाठी काम करत आहे. मी 'नई रोशनी' नावाच्या संस्थेशी संबंधित होती. हळूहळू लोक या संस्थेत सामील होऊ लागले. त्यातून रोजगार आणि पैसेही मिळत होते.

यानंतर मी वृद्धांसाठी वृद्धाश्रम उभारले. आमच्या संस्थेने रेड लाइट एरियामध्ये राहणाऱ्या महिला आणि त्यांच्या मुलांची रेशन कार्ड, आधार कार्ड बनवून त्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करण्यात आले.

जोयिता न्यायाधीश कधी झाली?

जोयिता 29 वर्षांची होती तेव्हा तिला देशातील पहिली ट्रान्सजेंडर न्यायाधीश बनवण्यात आले. जोयिताची 8 जुलै 2017 रोजी पश्चिम बंगालच्या इस्लामपूर येथील लोकअदालतीमध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

Coastal Road: वेगमर्यादा, प्रवेशबंदी आणि प्रवेश मार्ग; कोस्टल रोड, सी लिंकवरील वाहतुकीसाठी नवे नियम जारी

Marathi News Live Updates : माझी विनंती आहे कोर्ट आदेश डेसिबल पातळी पाळून गणेश उत्सव साजरा करावा - मेधा कुलकर्णी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

SCROLL FOR NEXT