Garba Night Sakal
लाइफस्टाइल

Garba Night: गरबा खेळताना हार्ट अटॅक येऊ शकतो का? वाचा डॉक्टर काय सांगतात

Navratri 2024: नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेचीमनोभावे पूजा केली जाते. तसेच देवीसमोर गरबा आणि दांडिया खेळला जातो. पण गरबा खेळताना हार्टअटॅकमुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागतो. पण खंरच गरबा खेळताना हार्टअटॅक येतो का आणि गरबा खेळताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

पुजा बोनकिले

शारदीय नवरात्रीचा उत्साह ३ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेची पूजा केली जाते. तसेच अनेक ठिकाणी पूजा मंडप उभारून गरबाचे आयोजन केले जाते. देशभरात विविध भागात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण कधी कधी गरब्यामुळे थकवा, अशक्तपणा किंवा हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो.

गेल्या काही वर्षापासून नवरात्रीत गरबा खेळताना लोकांना हार्ट अटॅक आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व प्रकारच्या वयोगटातील लोकांना हार्ट अटॅक येतो. खरतर गरबा खेळताना हार्ट अटॅक येतो का आणि ते टाळण्यासाठी काय करावे हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

गरबा खेळताना हार्ट अटॅक येतो का ?

गरबा खेळताना हार्ट अटॅक येण्यामागे अनेक कारणे असू शकते. यात हार्ट अटॅकवर योग्य उपचार न घेणे तसेच गरब्याचा अचानक शरीरावर ताण येणे असू शकते. याशिवाय खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, डिहायड्रेशन, अपुरी झोप यासारख्या कारणांमुळे हार्ट अटॅख येऊ शकतो.गरबा खेळताना हृदयाची गती अचानक वाढू शकते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

गरबा खेळताना कोणती काळजी घ्यावी

आरोग्यासंबंधित तपासणी

तुम्हाला नवरात्रीत गरबा खेळायचा असेल तर आरोग्यासंबंधित तपासणी करावी. तुम्हाला कोणता आजार असेल तर गरबा खेळणे टाळावे. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन गरबा खेळावा.

हायड्रेट राहावे

गरबा खेळताना भरपुर पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरात पाण्याची पातळी कमी असल्यास डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते. तसेच नवरात्रीच्या उपवासा दरम्यान फळांचा रस प्यावा. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

व्यायाम करावा

गरबा खेळण्यापुर्वी व्यायाम करावा. शरीर लवचिक असेल तर स्नायू ताणले जाणार नाही. तसेच गरबा खेळताना कोणताही त्रास होणार नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता प्रादेशिक सैन्यातही महिलांना संधी मिळणार, भारतीय लष्कराचा प्रायोगिक तत्वावर विचार

Dombivli Politics: टिळकनगरमध्ये मतदारांचा वेगळा कौल; 'स्थानिकच नगरसेवक हवा, उपरा नकोच'!

Latest Marathi Breaking News : अहिल्यानगर मधील खारेकर्जुन येथे बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला

Stock Market Today : शेअर बाजाची हिरव्या रंगात सुरुवात; सेन्सेक्स 240 अंकांनी वाढला; तर निफ्टी बँकने उच्चांक गाठला!

Truck Catches Fire: 'ट्रकला आग लागून २९ गायी भस्मसात'; नागपुरातील कत्तलखान्यासाठी गायींची बेकायदा वाहतूक, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT