Navratri Rangoli 2024: Sakal
लाइफस्टाइल

Navratri Rangoli 2024: कन्यापूजनाच्या दिवशी अंगणात काढा सोप्या अन् सुंदर रांगोळी डिझाइन्स, माता दुर्गा होईल प्रसन्न

Navratri Latest Rangoli Design: नवरात्रीच्या नवव्या दिवशी कन्यापूनज केले जाते. माता दुर्गेच्या रूपात घरी येणाऱ्या मुलींचे स्वागत करण्यासाठी अंगणात सुंदर रांगोळी काढायची असेल तर पुढील डिझाइन्सची मदत घेऊ शकता.

Puja Bonkile

Navratri Latest Rangoli Design: शारदीय नवरात्रीतमध्ये कन्या पूजनाला खास महत्व आहे. नवरात्रीत माता दुर्गेचे भक्त नऊ दिवस उपवास करतात आणि शेवट्या दिवशी लहान मुलींना घरी जेवणाला बोलावतात. या मुलींना माता दुर्गेचा अवतार मानला जाते. माता दुर्गेच्या रूपात घरी येणाऱ्या मुलींचे स्वागत करण्यासाठी घराच्या अंगणात सुंदर रांगोळी डिझाइन काढायची असेल तर पुढील डिझाइन्सची मदत घेऊ शकता. घरी आलेले सर्वजण कौतुक करतील.

नवरात्रीत कन्यपुजनाच्या दिवशी झेंडूचे फुल आणि पानांचा वापर करून सुंदर रांगोळी काढू शकता. यासाठी एक तांब्याची प्लेट वापरावी. त्यात मातेचा चेहरा काढावा. त्याभोवती आंब्याचे किंवा विड्यांचे पाने सजावटीसाठी वापरू शकता. तसेच काळ्या आणि पिवळ्या रांगोळी रंगाचा वापर करून मंगळसुत्राची डिझाइन तयार करू शकता. यामुळे घराच्या अंगणाची शोभा वाढेल.

कन्यापुजनाच्या दिवशी जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही फुलांची सुंदर रांगोळी काढू शकता. फुलांची रांगोळी पटकन तयार होते आणि ती खूप सुंदर दिसते.

नवरात्रीत कन्यापुजनाच्या दिवशी मातेच्या पावलांची रांगोळी काढू शकता. यामुळे मातेच्या रूपात येणाऱ्या मुली देखील प्रसन्न होतील. यासाठी रांगोळीच्या कोणत्याही रंगाचा वापर करून गोलाकारात पावल काढू शकता. ही रांगोळी दिसायला सुंदर असून कमी वेळेत तयार होते.

कन्यापूजनाच्या दिवशी घराच्या अंगणात सुंदर आणि कमी वेळेत रांगोळी काढायची असेल तर वरील फोटोप्रमाणे रांगोळी काढू शकता. तुम्ही रांगोळीचा पिवळा किंवा कोणताही रंग वापरू शकता. त्यात देवीचा चेहरा ,तसेच त्यात हळद- कुंकु, तांदुळाचा वापर करून सजावट करू शकता. यामुळे माता दुर्गा प्रसन्न होईल आणि अंगाणाची शोभा वाढेल.

नवरात्रीत कन्यापूजेच्या दिवशी दारासमोर बॉर्डर रांगोळी काढायची असेल तर वरील फोटोप्रमाणे काढू शकता. बॉर्डर रांगोळीमुळे घराची शोभा अदिक वाढेल. तसेचमाता दुर्गा देखील प्रसन्न होईल. यासाठी रंगीत रांगोळीचा वापर करू शकता. ही डिझाइन काढणे सोपे असून कमी वेळेत तयार होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT