Today Navratri Colour 2024 Sakal
लाइफस्टाइल

Today Navratri Colour: नवरात्रीचा चौथा रंग केशरी, 'या' मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून घ्या आउटफिट आयडिया, दिसाल सुंदर

Navratri 2024: आज नवरात्रीचा चौथा दिवस असून आजचा रंग केशरी आहे. आजच्या दिवशी केशरी रंगाचे कपडे घालून माता दुर्गाची पूजा केल्यास सुख-समृद्धी लाभेल. हा रंग सकारात्मकतेने आणि उत्साहाने भरलेला असतो.

पुजा बोनकिले

Today Navratri Color: शारदीय नवरात्रीचा आज चौथा दिवस आहे. आज कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी तिची पूजा केली जाते. नवरात्रीच्या प्रत्येकदिवसासाठी खास रंग निवडण्यात आला आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केशरी रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. तुम्हाला आज क्लासी आणि हटके दिसायाचे असेल तर बॉलिवूड अभिनेत्रींकडून ड्रेसची कल्पना घेऊ शकता.

Amruta khanvilkar

अमृता खानविलकर केशरी रंगाच्या पैठणीमध्ये खुप सुंदर दिसत आहे. यंदा नवरात्रीत तुम्ही अमृतासारखी तयारी करू शकता. असा लूक करून ऑफिसला किंवा कार्यक्रमात गेल्यास सर्वजण कौतुक करतील. तुम्ही गळ्यात दागिने किंवा एक लांब चेन घालू शकता. तसेच कानात केशरी रंगाचे कानातले घालू शकता. नाकात नथ घालतल्यावर सौंदर्यात आणखी भर पडते.

mukta barve

तुम्हाला साडी नेसायची नसेल तर मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वेप्रमाणे केशरी रंगाचा ड्रेस परिधान करू शकता.या ड्रेसमध्ये ती खुपच गोड दिसत आहे. तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाची ओढणी घेऊ शकता. तुम्ही ऑफिस किंवा कोणत्याही कार्यक्रमात हा ड्रेस घालून जाऊ शकता. यावर तुम्ही हलका मेकअप करू शकता. ज्यामुळे तुमचे सौंदर्य अधिक वाढेल.

hruta durgule

हृता दुर्गुळेप्रमाणे तयारी करून नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पारंपारिक लूक मिळवू शकता. यासाठी हृतासारखी केशरी रंगाची साडी परिधान करू शकता. गळ्यात मोत्यांचा हार परिधान करू शकता. कानात मॅचिंग झुमके घालू शकता. तुम्ही केस मोकळे किंवा हेअर स्टाइल करू शकता. अशी तयारी करून तुम्ही ऑफिस किंवा कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ शकता.

spruha joshi

नवरात्रीत आज केशरी रंगाची साडी परिधान करायची असेल तर स्पृहा जोशीप्रमाणे तयारी करू शकता. हातात हिरव्या बांगड्या , नाकात नथ तसेच केसांचा आंबाडा बांधून त्यात लाला फुल लावू शकता. तुम्ही निळ्या रंगाचे ब्लाऊज घालून अधिक स्टायलिश आणि पांरपारिक लूक मिळवू शकता.

prajkta mali

नवरात्रीचा आज चौथा दिवस असून आजचा शुभ रंग केशरी आहे. तुम्हाला केशरी रंगाची साडी नेसायची असेल तर प्राजक्ता सारखी तयारी करू शकता. ती पैठणीत खुप सुंदर दिसत आहे.मोठे कानातले, गळ्यात चोकर आणि हातात हिरव्या बांगड्या अधिक सौंदर्य वाढवते. तुम्ही डार्क मेकअप करून सुंदर दिसू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT