fashion style sakal
लाइफस्टाइल

Fashion: नवरात्रीत लेहंगा घालायचाय? 'या' अभिनेत्रींसारखा लूक कराल तर खुलून दिसाल!

बाजारात लेहेंग्याचे अनेक पर्याय असले तरी नवरात्रीला नक्की कोणता लेहेंगा घालायचा या संभ्रमात असाल तर तूम्ही या अभिनेत्रीं सारखा लुक रिक्रिएट करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

नवरात्री हा अतिशय पवित्र सण असून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्रीचे नऊ दिवस अगदी जल्लोषात साजरे होतात. कोरोनामुळे गेली २ वर्ष कोणतेही सण मोठ्याने साजरे करणे शक्य झाले नाही. पण, यंदा मात्र गरबा, दांडिया, उपवास, नवदुर्गा दर्शन मोठ्या उत्साहात होईल.

गरब्यासाठी लेहंगा घ्यायला महिला, तरूणी आतापासूनच खरेदीला जात आहेल. पण, नक्की काय घ्यायचे, त्यावर ज्वेलरी कोणती घ्यायची,यामुळे त्या गोंधळलेल्या असतील. कारण गेल्या २ वर्षात कोणता नवा ट्रेंड आलाय. हेच माहीती नाही.

बाजारात लेहेंग्याचे अनेक पर्याय असले तरी नवरात्रीला नक्की कोणता लेहेंगा घालायचा या संभ्रमात असाल तर तूम्ही या अभिनेत्रींसारखा लुक रिक्रिएट करू शकता.

फ्लोरल प्रिंट लहंगा

आजकाल फ्लोरल प्रिंट डिझाइन फॅशन ट्रेंडमध्ये आहे. या नवरात्रीत तुम्हाला हटके लुक करायचा असेल.तर, तुम्ही हा फ्लोरल प्रिंट लेहेंगा वापरून पहा. कतरिना कैफचा हा लूक तुम्हीही ट्राय करू शकता. हा लेहंगा हेवी नसल्याने दांडिया खेळणे अधिक सोपे होईल.

या फ्लोरल प्रिंट लेहंग्यावर डार्क मेकअप आणि डार्क रंगाची लिपस्टिक वापरून पहावी. या लेहेंग्यासोबत तुम्ही नाजूक नेकलेस घालू शकता. या लूकवर मोकळे केस खूप अधिक छान दिसतील.

इंडिगो जॉर्जेट प्रिंटेड लहंगा

तुम्ही आलिया भटचे फॅन असाल तर, या नवरात्रीत तिच्यासारखा निळा इंडिगो जॉर्जेट प्रिंटेड लेहेंगा ट्राय करू शकता. लेहेंग्याच्या फॅब्रिकपासून ते त्याच्या रंगापर्यंत आलियाचा लूक रॉयल आहे. गर्दी आणि लायटींगमध्ये निळा रंग एक वेगळाच लुक असतो. या लुकमध्ये गरबा खेळणे अधिक कम्फरटेबल वाटेल.

या इंडिगो जॉर्जेट प्रिंटेड लेहेंग्यावर हलका मेकअप आणि न्यूड पिंक किंवा पीच कलरची लिपस्टिक लावू शकता. या लूकमध्ये हेवी इअररिंग्स घालणे चांगले दिसेल.

सिल्क लहंगा

नवरात्रित क्लासी लुक मिळवण्यासाठी तुम्ही सिल्क लेहेंगा नक्की घाला. हा लेहंगा तुम्हाला बाजारात 4000 ते 5500 रुपयांना मिळेल. सोनम कपूरसारखा गोल्डन प्लेन कलरचा सिल्क लेहेंगाही ट्राय करू शकता.

या लुकसोबत हेवी मेकअप चांगला दिसेल. तसेच, त्यावर गडद रंगाची लिपस्टिक तूमच्या सौंदर्यात भर घालेल. या लेहंग्यावर हेवी इअररिंग्स छान दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT