Neck Pain Sakal
लाइफस्टाइल

Neck Pain : तुम्हालाही होतोय मानदुखीचा त्रास? चिंता नको, 'या' गोष्टी फॉलो करा, लगेच मिळेल आराम

Neck Pain: तुम्हालाही लॅपटॉवर तासंतास एकसारखे काम करून मानदुखीचा त्रास होत असेल तर काही सोप्या गोष्टी करू शकता. ज्यामुळे लगेच आराम मिळेल.

Puja Bonkile

Neck Pain Home Remedies: आजकाल अनेक लोकांना मानदुखीची समस्या जाणवते. डेस्क जॉब तसेच लॅपटॉपवर तासंतास काम करणाऱ्या लोकांना मानदुखीचा जास्त त्रास होतो. त्यामुळे मानेच्या मागे तीव्र वेदना सुरू होतात. जर तुम्हालाही मानदुखीचा त्रास होत असेल तर पुढील काही उपाय करून लगेच वेदना कमी करू शकता.

working

मान स्ट्रेच करा

मानदुखी लगेच कमी करायची असेल तर थोडं मानेला ताण द्यावा. म्हणजेच स्ट्रचिंग करावे. यामुळे वेदनेपासून आराम मिळतो. यासाठी मान हनुवटीवर ठेवा आणि मान खाली वाकवा. काही वेळाने मान वर करा आणि मागे वळवा. हा व्यायाम ४-५ मिनिटे करावा.

neck pain

बॉलने मसाज करा

मानदुखी कमी करण्यासाठी बॉलचा वापर करू शकता. यामुळे लगेच वेदना कमी होतात. तुम्ही टेनिस बॉलचा वापर करू शकता. या बॉलने दाबून मसाज केल्यास वेदना कमी होतात. त्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी होतात.

मानेला शेक द्यावा

एकसराखे खाली पाहून काम करत मानेत वेदना होत असेल तर हिटिंग पॅडचा वापर करून शेक देऊ शकता. यामुळे लगेच आराम मिळतो. तसेच आंघोळ करताना कोमट पाण्याचा वापर करावा यामुळे मानदुखी कमी होते. तसेच रक्तप्रवाह सुरळित होतो.

बेलण्याचा वापर

मानदुखी कमी करण्यासाठी बेलण्याचा वापर करू शकता. यासाठी मानेवर बेलणे हलक्या हाताने फिरवावे. यामुळे वेदना कमी होतील.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Ticket Price : एसटी प्रवास महागणार? मे महिन्यानंतर खिशाला कात्री बसण्याची शक्यता; काय आहे कारण?

MS Dhoni आज 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून खेळणार होता, परंतु असं काहीतरी घडलं की...! त्यात, R Ashwin च्या ट्विटने खळबळ

' तो मला किस करतच राहिला आणि ...' प्रिया बापटने सांगितला सेटवरचा अनुभव, म्हणाली...'त्याने मला चुकीच्या ...'

आता मनमानी पद्धतीने शाळांचे स्थलांतर होणार नाही! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; नवे नियम लागू

Latest Marathi News Live Update : मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

SCROLL FOR NEXT