Maharashtra ST fare hike
esakal
Maharashtra ST bus fare hike latest news : देशभरात वाढत्या महागाईचा परिणाम आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही दिसून येण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असताना, राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिले आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून पुरवठा न मिळाल्यास मे महिन्यानंतर एसटीच्या भाड्यात वाढ करावी लागू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.