Necklace Designs
Necklace Designs esakal
लाइफस्टाइल

Necklace Designs : साडीवर रॉयल लूक हवाय? मग, नेकलेसच्या ‘या’ आकर्षक डिझाईन्सची घ्या मदत

Monika Lonkar –Kumbhar

Necklace Designs : साडीची फॅशन ही नेहमीच ट्रेंडमध्ये राहणार यात काही शंका नाही. कारण, कार्यक्रम कोणताही असो, महिलांची सर्वात आधी पसंती ही साडीलाच असते. साडी नेसण्याचे आणि साडीचे विविध प्रकार आपल्याला पहायला मिळतात.

साडीसोबतच तुम्ही मेकअप, हेअरस्टाईल, ज्वेलरी कशी आणि कोणती कॅरी करताय? याला खास असे महत्व आहे. जर या गोष्टी नीट जुळून आल्या तर साडीतला तुमचा लूक आणखी खुलून दिसण्यास मदत होते.

साडीला रॉयल लूक देण्यासाठी ज्वेलरी अतिशय महत्वाची भूमिका बजावते. ज्वेलरीमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन्स पहायला मिळतील. मात्र, स्टायलिश आणि एलिगंट लूक हवा असेल तर तुम्हाला साडीवर स्टेटमेंट नेकलेसची निवड करावी लागेल.

नेकलेसमध्ये तुम्हाला अनेक प्रकार आणि डिझाईन्स पहायला मिळतील. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारांमध्ये तुम्ही नेकलेसची खरेदी करू शकता. आज आपण साडीला रॉयल लूक देणाऱ्या अशाच काही स्टेटमेंट नेकलेसच्या डिझाईन्स पाहणार आहोत. कोणत्या आहेत या लेटेस्ट नेकलेस डिझाईन्स? चला तर मग जाणून घेऊयात.

डायमंड नेकलेस डिझाईन

जर तुम्हाला साडीवर क्लासी आणि फॅन्सी असे दोन्ही लूक कॅरी करायचे असतील, तर तुम्ही या प्रकारचे हिऱ्यांचे दागिने साडीवर घालू शकता. उद्योजिका नीता अंबानी यांनी अतिशय ग्रेसफुली या साडीवर ही हिऱ्यांची ज्वेलरी कॅरी केली आहे.

या प्रकारच्या हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये तुम्हाला ग्रीन एमरल्डमध्ये अनेक व्हरायटी पहायला मिळतील. अशा प्रकारच्या हिऱ्यांच्या दागिन्यांसह तुम्ही तुमच्या हातात  मॅचिंग डिझायनर अंगठ्या देखील घालू शकता. (Diamond Necklace Design)

गोल्डन कलरचा चोकर सेट

गोल्डन कलरची कोणतीही ज्वेलरी असो मग तो नेकलेस असो किंवा चोकर असो, तो कोणत्याही लूकवर बेस्टच दिसतो. खास करून साडीवर गोल्डन कलरचे चोकर सेट खूपच खुलून दिसतात.

Golden Choker Set

जर तुम्हाला साडीवर परफेक्ट ट्रॅडिशनल लूक हवा असेल तर, अभिनेत्री दीपिका पादूकोणप्रमाणे तुम्ही देखील असा गोल्डन चोकर सेट परिधान करू शकता. साडीसोबतच तुम्ही पंजाबी ड्रेस किंवा सूटवर ही असा चोकर सेट गळ्यात घालू शकता. या प्रकारच्या स्टेटमेंट चोकरसोबत तुम्ही हेव्ही झुमके किंवा गोल डिझाईनचे स्टड्स देखील कानात घालू शकता. (Golden Colour Choker Set)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT