Neem Leaf Benefits  esakal
लाइफस्टाइल

Neem Leaf Benefits : आजारपण मागे लावून घ्यायचं नसेल तर कडुलिंब खाण्याशिवाय पर्याय नाही; कसा खायचा ते पहा!

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे कडुलिंब

Pooja Karande-Kadam

Neem Leaf Benefits : आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कडुलिंब अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कडुलिंबाची चव कडू असली तरी, कडुलिंबात अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे आरोग्यासाठी चांगले आहेत. आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाचे सेवन केल्यास शरीरातील अर्धे आजार बरे होतात.

आयुर्वेदिक दृष्टीकोनातून कडुलिंब खूप महत्वाची मानली जाते. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे आरोग्यासाठी चांगले आहेत. आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाचे सेवन केल्याने शरीरातील अर्धे रोग नष्ट होतात. रीकाम्या पोटी कडुलिंब खाण्याचे काय फायदे आहेत.

मधुमेहावर गुणकारी

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. लोक अजूनही घरगुती उपचारांवर विश्वास ठेवतात. मात्र, कडुलिंबाची पाने मिळविण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी खाणे हा एक घरगुती उपाय आहे. असे केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

रक्त शुद्ध ठेवते

अनेकवेळा रक्त दुषित झाले तर शरीरात अनेक आजारांचा संचार होऊ शकतो. यावर कडुलिंबाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. यात असे औषधी गुणधर्म आहेत की ते शरीरातील रक्त पूर्णपणे शुद्ध करते. हे रक्तातील विषारी पदार्थ काढून रक्त डिटॉक्सिफाय करते. तुमचे रक्त शुद्ध राहिल्यास तुम्हाला कोणताही आजार होणार नाही.

पोटासाठी फायदेशीर

कडुलिंब केवळ त्वचेसाठीच नाही तर पोटासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये असलेले गुणधर्म अॅसिडिटीसाठी अतिशय उपयुक्त असून कडुलिंबाची पाणी सकाळी उठून रिकाम्या पोटी प्यायल्याने अॅसिडिटी आणि अपचनापासून आराम मिळतो.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर

कडुनिंबाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. इतकंच नाही तर सर्दी, खोकला यांसारखे आजार बरे करण्यासाठीही याचा उपयोग केला जातो.

कडुलिंबाच्या पानांचे सेवन कसे करावे

साधारणपणे कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून त्यातून काढलेला रस सेवन केला जातो.

असाही खा कडुलिंब

नेहमी ताज्या कडुलिंबाच्या पानांचा रस घ्या. कडुनिंबाची घ्यायची असेल तर त्यात तव्यावर सुकवुन, किसलेले खोबरे, लसूण आणि मोहरीचे तेल घालून भातासोबत सेवन करावे.

कडुलिंबाची पाने खाताना काळजी घ्या

कडुलिंबाचे फायदे व्हावेत म्हणून तुम्ही एकाचवेळी जास्त पाने खाऊ नका. त्याला तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट करा. तुम्ही सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करणे चांगले आहे. तुम्हाला कोणताही आजार असल्यास, कृपया ते सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तिपीठ महामार्गामुळे दर वाढणार, जमीन खरेदी करायला लावून फसवणूक; खरातचा स्वत:च्या CAलाच पावणेनऊ कोटींचा गंडा

AI and post‑2000 era : दोन हजारोत्तरी काळ, डिजिटल क्रांती आणि एआयचा उदय; बदलत्या जगातल्या आपल्या जाणिवांचा वेध

Facebook Fraud Marriage : फेसबुकवरून ओळख, अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचा विश्वास; रायगडचे कुटुंब कोल्हापुरात आलं अन् घडलं भलतचं...

Pune PMPML: चालकांची बेफिकिरी केव्हा थांबणार?, प्रवासी नसूनही थांब्यावर, पुण्यातील पीएमपी आगारात बस कित्येक मिनिटे सुरूच..

ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार, सिक्रेट सर्विसने वाचवला जीव; हल्लेखोर ताब्यात, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT