skin sakal
लाइफस्टाइल

Skin Care: तुम्हीही फेस वॉशनंतर टॉवेलचा वापर करता? त्वचेला होऊ शकते भयंकर नुकसान

अस्वच्छ टॉवेलचा वापर केल्यास चेहऱ्यावर मुरुम येऊ शकतात.

Aishwarya Musale

त्वचा निरोगी, मुलायम आणि चमकदार ठेवण्यासाठी आपण खूप काही करतो. एकाहून एक महागडी सौंदर्य उत्पादने वापरतो. वेगवेगळ्या प्रकारचे फेस पॅक लावले जातात. अनेक घरगुती उपाय करतो. पण तरीही अनेक वेळा त्वचेशी संबंधित समस्या सतावू लागतात.

मग लोक विचार करू लागतात की इतकी काळजी घेऊनही त्वचेच्या समस्या कशा होऊ शकतात. केवळ चांगली उत्पादने वापरून आणि फेसपॅक लावून त्वचा निरोगी ठेवता येत नाही. तुम्हाला त्या चुकाही सुधाराव्या लागतील, ज्यामुळे त्वचा खराब होते.

त्वचेची काळजी घेताना आपण अनेकदा अशा काही चुका करतो, ज्यामुळे आपल्याला त्वचेच्या समस्या उद्भवू लागतात, जसे की चेहऱ्यावर टॉवेल वापरणे. अनेकजण चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने तोंड पुसतात. असे बरेच लोक आहेत ज्यांचा टॉवेल खूप घाण असतो, तरीही ते बेफिकीरपणे वापरतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टॉवेल देखील तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्या देऊ शकतो.

रिपोर्टनुसार, टॉवेलने चेहरा पुसल्याने त्वचेवर वाईट परिणाम होतो. कारण टॉवेलमध्ये E.coli (Escherichia coli) सारखे धोकादायक जीवाणू आढळतात. जेव्हा तुम्ही टॉवेलने तुमचा चेहरा पुसता तेव्हा त्यातून E.coli बॅक्टेरिया तुमच्या त्वचेत प्रवेश करू शकतात.

हे बॅक्टेरियाच नाही तर टॉवेलचा खडबडीत पोतही त्वचेला हानी पोहोचवण्याचे काम करते. असे केल्याने त्वचेवर लहान क्रॅक होऊ शकतात आणि दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. तुम्ही टॉवेल वापरू नये कारण ते तुमच्या त्वचेवरील नैसर्गिक तेल काढून टाकू शकते, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते. चेहरा पुसण्यासाठी नेहमी मऊ टॉवेल किंवा कापड वापरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गर्जना ! 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई सिनेमामधून

Ind vs WI 2nd Test : कुलदीप यादवच्या चक्रव्यूहमध्ये फसला वेस्टइंडीज; २४८ धावांवर ऑलआऊट, फॉलोऑनची नामुष्की

Mumbai BMC: छटपूजा उत्‍सवासाठी पालिकेची योजना; मेट्रो, बेस्टसह इतर सुविधांचा विस्तार करणार

Pune Farmers : पुण्यातील पीक कर्जवाटपात ९०० कोटींची घट; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Hinjawadi Protest : विकास हवा, मृत्यू नको; बळींना जबाबदार कोण? हिंजवडीतील अपघात सत्राचा निषेध; राज्य सरकार, विविध शासकीय यंत्रणांबद्दल रोष

SCROLL FOR NEXT