लाइफस्टाइल

ब्राच्या स्ट्रिप्स ड्रेसबाहेर दिसतात, हे प्रकार वापरून पाहा

अशामुळे अनेक मुली गोंधळतात

सकाळ डिजिटल टीम

ब्राच्या विविध स्टाईल बरोबर त्याच्या स्ट्रीप्सबाबतही हल्ली महिला चोखंदळ झाल्या आहेत. काहीना ब्राचा पट्टा ड्रेसबाहेर आला तर अगदी अवघडल्यासारखं होतं. लोकांसमोर पट्टा आत कसा घ्यायचा असा प्रश्न त्यांना पडतो. पण काही मुलींना पट्टा दिसला तरी फारसा फरक पडत नाही. उलट त्या ब्राच्या पट्ट्याचे वेगवेगळे प्रकार ट्राय करतात. साडी नेसल्यावर कधीकधी ब्लाऊज बाहेर असे पट्टे दिसायला लागतात. या कटकटीपासून मुक्ती मिळवायची असेल तर आजकाल बाजारात वेगवेगळ्या ब्रा स्ट्रीप्स मिळतात. त्या ट्राय करून पाहा. या स्ट्रीप्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदलूही शकता.

ब्रा कन्वर्टर - आजकाल पट्ट्याशिवायही ब्रा घालता येते. त्यासाठी ब्रा कन्वर्टर हा बेस्ट पर्याय आहे. आपल्या छातीचा आकार आणि फिटिंगनुसार यात विविध पर्याय मिळतात. या ब्रा तुम्ही बॅकलेस ब्लाऊज, ड्रेसवर घालू शकता. यातून पट्टा दिसण्याची काळजी नसल्याने तुम्ही बिनधास्त असता. 

प्लास्टिक स्ट्रीप्स-  आता नेहमीच्या ब्रा बरोबर प्लास्टिक स्ट्रीपही मिळायला लागल्या आहेत. जेव्हा वेगळ्या पद्धतीचा ड्रेस किंवा ब्राऊज घालायचा असेल तेव्हा प्लास्टिक स्ट्रिप्स वापरायच्या. अशी स्ट्रीप्स बदलण्याची सोय ब्रामध्ये असते. तुम्ही ब्राच्या पाठीमागचा पट्टाही प्लास्टीकचा ठेवू शकता. 

स्वीच ऑफ बटणाचा उपयोग- साधारणपणे ड्रेस, ब्लाऊजमध्ये स्विच ऑफ बटण असते. त्यामुळे ब्राचे पट्टे लपविता येतात. पण काहीवेळा हे वापरूनही पट्टे दिसतात. अशावेळी तुम्हाला ब्राच्या पट्ट्याच्या आतून पीन लावावी लागेल. 

ब्रा स्ट्रेप्स कट कराव्यात - बॅकलेस ब्लाउज घातल्यावर, अनेकदा ब्राच्या पट्ट्या  मागच्या बाजूला बाहेर येतात. हे खूप वाईट दिसते.अशावेळी मग मागच्या बाजुने ब्राच्या पट्ट्या कापून टाका आणि त्याच्या जागी एक किंवा दोन इंच परत शिवून घेणे फायद्याचे ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: टिकणारे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच: मनोज जरांगे- पाटील; प्रमाणपत्र रद्द करून जातीयवादी भूमिका

Viral Video : नोकरी न सोडता 'या' पठ्ठ्याने वर्षभरात कमावले एक कोटी, डोकॅलिटी पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Nagpur Crime: नागपुरात संतापजनक प्रकार! १६ वर्षीय मुलीला डांबून मारहाण, सिगारेटचे चटके दिल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींना या देशाबद्दल किंवा इथल्या लोकांबाबत अजिबात आदर नाही- भाजप खासदार प्रदीप कुमार सिंग

AUS vs BAN 1st Test: बांगलादेशचे निर्विवाद वर्चस्व; पण, मिचेल स्टार्कने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड, ऑस्ट्रेलियन गोलंदाज 'डाव्यां'मध्ये सरस

SCROLL FOR NEXT