EPFO GOOGLE
लाइफस्टाइल

पीएफ खातेदारांबाबत सरकारचा मोठा निर्णय; असा मिळणार लाभ

EPFO ने अद्याप अधिकृतपणे व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्याची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु काही मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहेत.

नमिता धुरी

मुंबई : केंद्र सरकार लवकरच पीएफ कर्मचार्‍यांसाठी नवा निर्णय घेणार आहे, ज्याचा फायदा ६ कोटींहून अधिक लोकांना होणार आहे. पीएफ कापून घेणारे ईपीएफओ आता लवकरच व्याजाचे पैसे खात्यात टाकणार आहे.

EPFO आता २०२१-२२ या आर्थिक वर्षातील PF कर्मचाऱ्यांच्या खात्यात ८.१ टक्के व्याजाचे पैसे ३० जूनपर्यंत हस्तांतरित करणार आहे. एवढ्या कमी व्याजाची घोषणा सरकारने ४० वर्षांत प्रथमच केली आहे. EPFO ने अद्याप अधिकृतपणे व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्याची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु काही मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहेत.

अशा प्रकारे खात्यातील रक्कम तपासा

याआधी तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची स्थिती सहज तपासू शकता. तुम्हाला तुमच्या पीएफ खात्याची शिल्लक तपासायची असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून ते सहज करू शकता.

तुम्ही PF खात्याशी लिंक असलेल्या रजिस्टर नंबरवरून 011-22901406 वर मिस-कॉल देऊन हे करू शकता. यानंतर लवकरच तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत नंबरवर एक संदेश येईल, ज्यामध्ये पीएफ शिल्लक माहिती दिली जाईल.

उमंग अॅप वरूनदेखील शिल्लक तपासा

उमंग अॅप तुमच्या स्मार्टफोनवर प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा.

तुमचा फोन नंबर नोंदवा आणि अॅपवर लॉग इन करा.

वरच्या डाव्या कोपऱ्यात दिलेल्या मेनूवर जा आणि 'सेवा निर्देशिका' वर जा.

EPFO ​​पर्यायावर क्लिक करा.

येथे व्ह्यू पासबुकमध्ये गेल्यानंतर, तुमचा UAN नंबर आणि OTP द्वारे शिल्लक तपासा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT