Relationship after Breakup
Relationship after Breakup Esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips| ब्रेकअपनंतर नव्या नात्याची सुरुवात करताय? मग या चुका टाळा

सकाळ डिजिटल टीम

ब्रेकअपनंतरचं नातं | New Relationship after Breakup:

प्रेमाचं नातं जगातील सर्वात सुंदर नातं असतं ( Love is beautiful relationship in the world). हे नातं कधीही तुटू नये, अशीच प्रत्येक जोडप्याची (Couple) अपेक्षा असते. परंतु कधी कधी हे नातं तुटतं. त्यासाठी विविध कारणे असू शकतात. त्यामुळे लव्ह लाईफवर (Love Life) ब्रेकअपची (Breakup) टांगती तलवार कायम असते. अनेकदा सकारात्मक विचार (Positive thinking) केल्यानंतरही त्यांचे नाते फार काळ टिकत नाही. ब्रेकनंतर एखादी व्यक्ती पुन्हा एखाद्या व्यक्तीशी नातेसंबंधात (Relationship) येते, तेव्हा त्यांना भीती (Fear) वाटू लागते की, त्यांचे हे नाते पूर्वीप्रमाणेच तुटू शकते. या परिस्थितीचा सामना करणाऱ्या लोकांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

1. पुर्वाश्रमीच्या जोडीदाराविषयी बोलू नका (Dont talk about old Partner)-

एखाद्या जुन्या गोष्टीचा संदर्भ म्हणून तुम्ही एखाद्या घटनेचा उल्लेख करू शकता, पण आनंदाच्या किंवा दु:खाच्या प्रसंगी भावूक होऊन तुमच्या पूर्वीच्या जोडीदाराबद्दल (Ex Partner) बोलणं योग्य नाही.

2. सोशल मीडियावर अपडेट करू नका (Don't update on Social Media)-

सोशल मीडियावर (Social Media) प्रत्येक गोष्ट पोस्ट (post) करणे आवश्यक नाही. विशेषतः पार्टनरसोबत आऊटिंग (outing), पार्टी (Party) किंवा रोमँटिक फोटो (Romantic Photo) टाकू नका. असे केल्याने गोष्टी बिघडू शकतात. मग तुमच्या फ्रेंडलिस्टमधील (Friendlist) प्रत्येकजण तुमचे खरे मित्र (True Friend) असतीलच असं नाही. त्यामुळे खासगी आयुष्यातील (Personal life) प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर अपडेट करणे टाळा.

3. वाद होत असताना जुन्या जोडीदाराशी तुलना करू नका (Don't compare with Ex Partner)-

काहीवेळा नात्यात किरकोळ वाद (Dispute) होणे सामान्य असते, पण या वादाला भांडणाचं (quirell) स्वरूप येते, जेव्हा आपण येथे जुना अनुभव सांगू लागतो किंवा नव्या जोडीदाराची तुलना (Comparison) पुर्वाश्रमीच्या जोडीदाराशी करू लागतो. यामुळे तुमचा जोडीदार नाराज होऊ शकतो.

4. जुन्या जोडीदाराचे प्रोफाइल किंवा अपडेट्स पाहणे टाळा (Don't watch Profile and updates of old Partner)-

जेव्हा तुमचे हृदय तुटते (Breakup) तेव्हा तुम्हाला तुमचा मुद्दा कोणाशी तरी शेअर करावासा वाटतो, परंतु तरीही, सोशल मीडियावर (Social Media) तुमची वेदनादायक कथा किंवा कविता लिहू नका, विशेषत: जेव्हा तुम्ही नवीन नातेसंबंधात प्रवेश केला असेल. त्याच वेळी, पूर्वाश्रमीच्या जोडीदाराच्या आयुष्यात डोकावणे टाळा. या सवयीमुळे तुमची फसवणूक होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT