लाइफस्टाइल

New Year Party Dresses : प्लस साइज मुलींनी न्यू इयर पार्टीसाठी हे आउटफिट्स करा ट्राय, दिसाल एकदम आकर्षक

फॅशनचे युग झपाट्याने बदलत असून बाजारात नवनवीन डिझाईनचे कपडे पाहायला मिळत आहेत.

Aishwarya Musale

आपल्यामध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांना न्यू इयर पार्टी करायला आवडते. म्हणूनच ते या दिवसाचे आधीच प्लॅन करू लागतात. पण आउटफिट्स बाबत कंफ्यूजन असतं कारण आपण स्लिम दिसण्यासाठी कोणता ड्रेस घालायचा हेच समजत नाही.

ही समस्या प्लस साइजच्या स्त्रियांना असते कारण त्यांना देखील असे वाटते की त्यांनी परिधान केलेल्या आउटफिटमध्ये ते चांगले दिसावेत, सुंदर दिसावे आणि स्लिम दिसावे. आम्ही दिलेल्या टिप्स एकदा फॉलो करून बघा.

फ्लेर्ड ड्रेस

जर तुम्हाला स्लिम दिसायचे असेल तर तुम्ही फ्लेर्ड ड्रेस घालू शकता. तुमच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला अनेक डिझाइन्स आणि नवीन पॅटर्नचे पर्याय मिळतील. ते परिधान करून तुम्ही सर्वात सुंदर दिसाल.

तसेच सर्वजण तुमची प्रशंसा करतील. याच्या मदतीने तुम्ही हाय हील्स आणि ओपन हेअरस्टाइल करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही जंक ज्वेलरी स्टाइल करू शकता. यासह तुम्ही खूप चांगले दिसाल. तुम्हाला या प्रकारचा ड्रेस बाजारात 500 ते 2000 रुपयांना मिळेल.

शिमर स्टाइल ड्रेस

जर तुम्हाला नवीन काही ट्राय करायचे असेल तर तुम्ही शिमर डिझाईन असलेले ड्रेस घालू शकता. तुम्हाला यामध्ये अनेक चांगले पर्याय मिळतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही व्ही डीप नेकलाइन खरेदी करू शकता अन्यथा स्लिट कट ड्रेसमध्येही असे अनेक पर्याय उपलब्ध असतील.

हा ड्रेस पार्टी लुकसाठीही खूप चांगला आहे. असा ड्रेस तुम्हाला बाजारातून 1000 ते 2000 रुपयांना मिळेल. ज्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्टाइल करू शकता.

स्लिट कट ड्रेस

आजकाल स्लिट कट ड्रेसेसचा खूप ट्रेंड आहे. तुम्ही या प्रकारच्या ड्रेसची स्टाईल देखील करू शकता. प्लस साइज मुलींसाठी देखील खूप चांगले पर्याय आहेत. हिवाळ्याचा हंगाम आहे, त्यामुळे तुम्ही मखमली डिझाइनचे ड्रेस खरेदी करू शकता.

ज्यामध्ये तुम्हाला समोर किंवा मागे एक लहान स्लिट कट मिळेल. जर तुम्ही हा ड्रेस बेल्टसह घातलात तर तुम्ही आणखी छान दिसाल. बाजारातून खरेदी केल्यास हा ड्रेस तुम्हाला १००० ते २००० रुपयांना मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT