Nita Ambani esakal
लाइफस्टाइल

Nita Ambani : नीता अंबानी यांनी सादर केला ‘दशावतार’, भगवान विष्णूंच्या १० अवतारांची सांगितली कथा, व्हिडिओ व्हायरल

Nita Ambani : नीता अंबानी यांनी भगवान विष्णूंच्या ‘दशावताराचा’ एक दृकश्राव्य स्वरूपातील एक व्हिडिओ सादर केला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Nita Ambani : रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी या सतत विविध कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या साडीमुळे, कधी ज्वेलरी तर कधी अप्रतिम लूकमुळे त्या चर्चेत असतात. नुकताच नीता अंबानी आणि मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा राधिका मर्चंटसोबत १२ जुलैला शाही विवाहसोहळा पार पडला. आता नीता अंबानींच्या एका अनोख्या उपक्रमाची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.

नीता अंबानी यांनी भगवान विष्णूंच्या ‘दशावताराचा’ एक दृकश्राव्य स्वरूपातील व्हिडिओ नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये नुकताच सादर केला. या व्हिडओमध्ये स्वत: नीता अंबानी यांनी त्यांच्या सुंदर शैलीत ही दशावताराची कथा सर्वसामान्यांसाठी मांडली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही संपूर्ण कथा पाहण्यासाठी सेंटरला भेट देण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.

भगवान विष्णूंच्या एकूण १० अवतारांना यापूर्वी क्वचितच कुणी अशा पद्धतीने सादर केले असेल. इतक्या सुंदर आणि आकर्षक पद्धतीने या ऑडिओ-व्हिज्युअल स्वरूपात त्याचे सादरीकरण करण्यात आले आहे.

दशावतार म्हणजे भगवान विष्णूंचे सर्व १० अवतार होय. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी सादर केलेल्या दशावतार दृकश्राव्यमध्ये संबंधित ठिकाणांचे व्हिज्युअल आवाजासहीत दाखवण्यात आले आहेत. ज्यामध्ये बनारसचे सुंदर रस्ते आणि तिथली सुंदर दृश्ये आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या निमित्ताने ही दृकश्राव्य स्वरूपातील आवृत्ती सादर करण्यात आली आहे. याद्वारे लग्नसोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या लोकांना हिंदू परंपरांची ओळख करून देण्याचा प्रयत्न ही करण्यात आला होता. काशीच्या समृद्ध परंपरेने प्रेरित दशावतारच्या दृकश्राव्य आवृत्तीमध्ये समृद्ध भारतीय संस्कृतीचा सर्वसमावेशक पद्धतीने समावेश करण्यात आला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानीने नुकतीच राधिका मर्चंटसोबत हिंदू रितीरिवाजांनुसार लग्नगाठ बांधली. या शाही विवाहसोहळ्यासाठी अनेक प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये, देश-विदेशातील प्रमुख व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Arrested : 'कॅप्टन' खरातचा घाणेरडा चेहरा उघड; महिलांच्या लैंगिक शोषणाचे 58 व्हिडिओ पोलिसांच्या हाती, राजकीय वर्तुळात खळबळ

लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ; अनेक महिला सेलिब्रिटींचा सहभाग, कोण आहे अशोक खरात? बाहेर लोक बसलले असताना, आत कॅबीनमध्ये करायचा चाळे

आपला माणूस शिवचा मराठी इंडस्ट्रीत दमदार कमबॅक ! मी धुरंधर गाणं होतंय सोशल मिडियावर ट्रेंड

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

SCROLL FOR NEXT