Nita Ambani Gayatri Mantra Red saree Sakal
लाइफस्टाइल

Gayatri Mantra: निता अंबानींच्या लाल साडीवर सोनेरी रंगात लिहिलेल्या गायत्री मंत्राच्या जपाचे फायदे

Nita Ambani Gayatri Mantra Red saree: निता अंबानींच्या लाल साडीवर सोनेरी रंगात लिहिलेल्या गायत्री मंत्राने सर्वांचे लक्ष वेधले असून जाणून घेऊया गायत्री मंत्राचा जप करण्याचे फायदे आणि गायत्री मंत्र जपताना कोणत्या माळेचा वापर करतात.

पुजा बोनकिले

Nita Ambani Gayatri Mantra red saree : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. पण देशभरात मुलाच्या लग्नापेक्षा निता अंबानी यांच्या साड्या आणि दागिन्यांची चर्चा सोशल मिडियावर जास्त होत आहे. नुकतंच त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये निता अंबानींनी गणपतीचे डिझाइन असलेले कानातले आणि लाल साडीवर सोनेरी रंगात गायत्री मंत्र लिहिले आहे. त्यांच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Nita Ambani

मुलाच्या लग्नापुर्वी अंबानी कुटुंबियांनी सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. या विवाह सोहळ्यात 50 जोडप्यांनी सात फेरे घेतले. या सोहळ्याला संपूर्ण अंबानी परिवार उपस्थित होता पण निता अंबानी यांच्या लाल रंगाच्या साडीने सर्वांचे लक्ष वेधले होते.

निता अंबानी यांनी सामुहिक विवाह सोहळ्या दरम्यान लाल रंगाची हेवी सिल्क साडी परिधान केली होती. त्यावर सोनेरी रंगाने गायत्री मंत्र लिहिलेला आहे. तसेच कानात गणपतीचे डिझाइन असलेले कानातले घातले होते आणि हातात कृष्णाची डिझाइन असलेला लाल रंगाचा बटवा होता. निता अंबानी यांचा हा लुक एखाद्या नव्या नवरीसारखा दिसत आहे. या साडीसोबत त्यांनी हेली ज्वेलरी परिधान केली आहे.

गायत्री मंत्राचा अर्थ

"ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्"

या मंत्राचा अर्थ प्राणस्वरूप, दुःखनाशक, सुखस्वरूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, देवस्वरूप परमात्मा, पापांचा नाश करणाऱ्या परमात्म्याला आपण आपल्या हृदयात धारण करू या. देव आपल्या बुद्धीला योग्य मार्ग दाखवतो. गायत्री मंत्राचा जप केल्याने आयुष्यात अनेक सकारात्मक बदल होतात. चला तर मग जाणून घेऊया गायत्री मंत्र जपाचे फायदे कोणते आहेत.

करिअरमध्ये प्रगती

मान्यतेनुसार गायत्री मंत्राचा नियमितपणे जप केल्याने करिअमध्ये प्रगती होते. तसेच यशाच्या शिखरावर पोहचता येते.

Nita Amabani

मनोकामना पुर्ण होतात

जर तुमच्या मनोकामना पुर्ण होत नसेल तर गायत्री मंत्राचा जप करू शकता.गायत्री मंत्राचा जप करताना ध्यान मुद्रेत बसावे.

नकारात्मकता दूर होते

एका शांत ठिकाणी बसूण गायत्री मंत्राचा जप करावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

मानसिक शांती मिळते

गायत्री मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळते. यामुळे मन आणि डोकं शांत होते. तसेच शांत झोप येते.

एकाग्रता वाढते

गायत्री मंत्राचा जप केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत मिळते. गायत्री मंत्राचा जप करताना रूद्राक्षाची माळ वापरावी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT