Nita Ambani Told Mukesh Ambani favorite food Diet And Daily Routine  
लाइफस्टाइल

Mukesh Ambani : करोडपती असणारे मुकेश अंबानी नाश्त्यामध्ये रोज खातात 'हा' एकच पदार्थ

सामान्य वर्गाला सेलिब्रिटी नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये नेमक कोणता आहार घेतात. त्यांची जीवनशैली कशी आहे याबद्दल अनेक प्रश्न त्यांच्या उपस्थित असतात. तर आज आपण मुकेश अंबानी यांच्या जीवन शैलीबद्दल जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

राधिका अनंत यांच्या लग्नामुळं सध्या अंबानी कुटुंब चांगलचं चर्चेत आहे. दोघांच्या लग्नाला अवघे काही दिवसच उरले आहेत. दरम्यान, अंबानी कुटुंबातील सदस्यांबद्दल काही खासगी गोष्टी समोर येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ईशा अंबानीने स्वतः बद्दल आणि तिच्या दोन जुळ्यांबद्दल मोठा खुलासा केला होता. आता मुकेश अंबानी यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी समोर आल्या आहेत. (Nita Ambani Told Mukesh Ambani favorite food Diet And Daily Routine )

सामान्य वर्गाला सेलिब्रिंटीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिक असते. सेलिब्रिटी नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये नेमक कोणता आहार घेतात. त्यांची जीवनशैली कशी आहे याबद्दल अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांच्या मनात उपस्थित असतात. तर आज आपण मुकेश अंबानी यांच्या जीवन शैलीबद्दल जाणून घेणार आहोत.

काही दिवसांपूर्वी निता अंबानी आपल्या मुलाची पत्रिका महादेवाच्या चरणी वाहन्यासाठी काशी विश्वनाला गेल्या होत्या. यावेळी माध्यामांशी संवाद साधताना मुकेश अंबानी यांच्या खास गोष्टी सांगितल्या.

मुकेश अंबानी यांचा आवडता पदार्थ कोणता

संपुर्ण कुटुंबाला घरीच बनवलेलं जेवण आवडतं असं निता अंबानी यावेळी म्हणाल्या. तसेच, मुकेश अंबानी शुद्ध शाकाहारी आहाराचे पालन करतात आणि आठवड्यातून एकदाच बाहेरचे अन्न खातात.

गुजराती पंकी हा त्यांचा आवडता पदार्थ आहे. हे तांदळाच्या पिठाच्या पिठापासून बनवले जाते, ज्यामध्ये चीजचा वापर अधिक केला जातो. हा पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून मेथी आणि हळद घालून मसालेदार तयार केला जातो. हे लोणच्याबरोबर किंवा चटणीसोबत दिले जाते.

जीवनशैली कशी आहे?

मुकेश अंबानी सकाळी साडेपाच वाजता उठतात आणि योग आणि ध्यान करतात. योगामध्ये सूर्यनमस्कार आणि चालणे असते. ज्यानंतर ध्यान केले जाते. कामासोबत अंबानी त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करतात.

मुकेश अंबानी यांचा नाश्ता हलका आणि पौष्टिक असतो. त्यात ताजी फळे, रस आणि इडली-सांबार यांचा समावेश आहे.

दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण, मुकेश अंबानी जेवणात भारतीय पदार्थांना स्थान देतात. विशेष करुन त्यांना गुजराती पद्धतीचा आहर आवडतो. ज्यामध्ये डाळी, भाज्या, भात, सूप आणि सॅलड यांचा समावेश होतो. तसेच अंबानी जंक फूड खाणं टाळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag Rules Change : 'फास्टॅग'चे नियम बदलणार! आता ‘या’ वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागणार

Tanya Mittal Case: तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ! फसवणुकीचा गंभीर आरोप अन्...; सोशल मीडिया इन्फ्लुएंसरकडून तक्रार दाखल

Mumbai Metro: मेट्रो ३ प्रवास आता अधिक सोपा! फीडर बस सेवेचा शुभारंभ, दर किती अन् कुणाला फायदा होणार?

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत विद्यार्थी व शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

Horoscope Prediction : येत्या 10 तासांमध्ये बदलणार तीन राशींचं नशीब ! बुध आणि गुरूच्या युतीमुळे होणार अफाट श्रीमंत

SCROLL FOR NEXT