Astrology Tips esakal
लाइफस्टाइल

Astrology Tips : नाकाच्या आकारावरून ओळखा स्वभाव, जाणून घ्या काय सांगतं सामुद्रिकशास्त्र

तुमच्या नाकाचा आकार कसा आहे? त्यावरून तुमचं व्यक्तीमत्व आणि स्वभाव ओळखता येऊ शकतो, असं सामुद्रिकशास्त्र सांगतं.

सकाळ डिजिटल टीम

Nose Shape Personality Test : माणसाच्या प्रत्येक अवयवावरून त्याच्या स्वभावाचा, व्यक्तीमत्वचा अंदाज लावता येतो. फेस रिडिंग करणारे नाकाच्या आकारावरून तुमचा स्वभाव सांगतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की ही कला साधारण तीन हजार वर्षांपूर्वीची आहे.

Straight Nose

सरळ नाक

सरळ नाकाचे लोक आकर्षक, स्पष्ट विचार करणारे, सहनशील, धैर्य आणि करूणा असणारे असतात. हे लोक फार दृढनिश्चयी आणि विवेकपूर्ण विचार करणारे असतात. प्रामाणिक असतात. विश्वासार्ह असतात. त्यामुळे यांच्याकडे अनेकांचे राज असतात.

Crooked Nose

वाकडं नाक

वाकडं नाक असणाऱ्या व्यक्ती मात्र त्यांच्या नाकाच्या आकाराच्या अगदी विरूध्द असतात. या व्यक्ती चारित्र्यवान आणि उदार असतात. हे एक उत्तम श्रोतापण असतात. मत व्यक्त करतानाही हे सभ्यता सोडत नाहीत. यांना गोष्टींचा गुंता वाढवणं आवडत नाही.

Fleshy nose

जाड नाक

ज्यांचे नाक जाड असतं ते स्पष्ट विचारांचे, चतुर, समजदार आणि सतर्क लोक असतात. पण लोकांना यांचे हे गुण तेव्हाच कळतात जेव्हा लोक त्यांना जवळून अनुभवतात. यांची निर्णयक्षमता चांगली असते. जेवढ्या लवकर निर्णय घेतात, तेवढ्याच लवकर त्यावर कृतीपण करतात. हे लोक पैसेपण विचारपूर्वकच खर्च करतात.

Button Nose

बटन नाक

या लोकांचे नाक जेवढे क्युट असते तेवढाच यांचा स्वभावही क्युट असतो. यांच्याकडे दृढ इच्छाशक्ती, निश्चयी स्वभाव आणि सहजता हे गुण असतात. हे जीवनात आशावादी असतात. हे लोक शांत बसू शकत नाहीत. कोणत्या ना कोणत्या कामात सतत स्वतःला गुंतवून ठेवतात.

Hawk Nose

हॉक नाक

ज्या लोकांचे हॉक नाक असतं ते लोक महत्वाकांक्षी, स्वतंत्र आणि नेतृत्व गुणी असतात. यांना संधी ओळखता येते. यशाच्या पायऱ्या चढताना स्वतःचा मार्ग स्वतः बनवतात. हे लोक स्त्री असो वा पुरुष आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहणं पसंत करतात.

Snub Nose

लहान नाक

लहान नाकाला स्नब नोज पण म्हणतात. असे लोक एखाद्या टीममध्ये सहज मिळसून जातात. यांना टीमने काम करणं उत्तम जमतं. सामान्यतः हसमुख, प्रेमळ असतात. सर्वांना मदत करतात. यशाची शिखरं गाठण्यासाठी यांना यांचा हा सर्वांना धरून ठेवण्याचा स्वभाव फायद्याचा ठरतो.

मोठं नाक

असे लोक यांचे स्वतंत्र विचार असतात. यांना कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. हे लोक बऱ्याचदा आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतात. हे लोक स्वतंत्र व्यक्तीमत्वाचे असतात. यांना कोणावर अवलंबून रहायला आवडत नाही. हे लोक जन्मजात नेता असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Tensions : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका!

Midday Meal Egg Controversy : मध्यान्ह भोजनात अंडे देण्यावरून वाद...एकाच वेळी ७० पालकांनी मुलांना शाळेतून काढलं

VIRAL VIDEO: ए काय करतोयस? सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला जोराचा धक्का; सगळेच अवाक, नेटकरी म्हणतात- त्याला...

Latest Maharashtra News Updates Live: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी

मृत्यूच्या दाढेतून परत आलेली सचिन यांची एकुलती एक लेक; "डॉक्टरांनी ती टेस्ट सांगितल्यावर मी हादरलो.."

SCROLL FOR NEXT