लाइफस्टाइल

आरोग्याची कोणती समस्या तुम्हाला येऊ शकते? वाचा Numerologyच्या नजरेतून

सकाळ डिजिटल टीम

न्यूमरॉलॉजी अर्थात अंकज्योतिषशास्त्र हे ज्योतिषशास्त्राचाच एक भाग आहे. हे एक असं शास्त्र आहे जे असं मानतं की आकाशस्थ ग्रहगोलांचा मानवी आयुष्यावर परिणाम होतो. न्यूमरॉलॉजीमुळे आपल्या आयुष्यात काय घडू शकतं याची पूर्वकल्पना देऊ शकते. तुमचा जन्मदिवसाचा आधार घेत, तुम्हाला कोणत्या प्रकारच्या आरोग्याच्या समस्या येऊ शकतात. याची माहिती न्यूमरॉलॉजीमुळे मिळते. या लेखाच्या माध्यमातून आपण न्यूमरॉलॉजीच्या माध्यमातून कशाप्रकारे अडचणींवर मात करु शकतो, याची माहिती घेणार आहोत.

क्रमांक 1 : जे लोक कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मले आहेत. त्यांचा सूर्य हा गुरुग्रह असतो. या तारखेला जन्मलेले लोकांना चांगलं आरोग्य लाभतं, असं म्हटलं जातं. सूर्य हा पाठ, हृदय, डोके, लिव्हर, पोट यांच्यावर ताबा ठेवतो, असं म्हणतात. त्यामुळे, या तारखांखालील लोकांना आरोग्याचा त्रास होऊ शकतो. जसे की हृदयाचा त्रास, रक्ताशी संबंधित कोणत्याही आरोग्यविषयक समस्या आणि त्याचे अनियमित रक्ताभिसरण इत्यादी.

क्रमांक १ च्या लोकांच्या जीवनामध्ये मोठे चैतन्य असते. म्हणून त्यांना कामाचा ताण फार जाणवत नाही. या लोकांनी ऍसिडीटी होणारे अन्न टाळावं. त्यांनी तेलकट पदार्थ टाळावेत आणि सुकामेवा, संत्रा, सफरचंद, आले आणि बार्लीचे सेवन वाढवावे. ऑक्टोबर, डिसेंबर आणि जानेवारी हे त्यांच्यासाठी इतके चांगले महिने नाहीत.

क्रमांक 2 : जे लोक 2, 11, 20, 29 तारखेला जन्मतात त्यांचा गुरुग्रह चंद्र असतो. हे लोक फार स्ट्राँग नसतात. त्यामुळे ते सहगत्या आजारी पडू शकतात. पोटाचे विकार अथवा अपचनामच्या समस्यांमुळे ते लगेच आजारी पडतात. क्रमांक 2 असणाऱ्या लोकांना दम्याचा त्रास आणि निद्रानाशाचा देखील विकार होतो. त्यांनी नियमितपणे त्यांच्या शरीराची मालिश करावी आणि दररोज सकाळी मधात काळी मिरी घालून खावी. कोबी, काकडी, गाजर किंवा मुळा यांसारखे हंगामी पदार्थांचे सेवन करण्याचा प्रयत्न करावा. जानेवारी, फेब्रुवारी आणि जुलै हे त्यांच्यासाठी हानिकारक महिने आहेत.

क्रमांक 3 : जे लोक 3, 12, 21, 30 तारखेला जन्मतात, त्यांचा गुरुग्रह गुरु असतो. हे लोक छाती किंवा फुफ्फुसांचे विकार, त्वचेच्या समस्या, मधुमेह, घसा खवखवणे आणि संधिवात यासारख्या आरोग्याच्या समस्यांना बळी पडतात. या लोकांना चरबीयुक्त जेवण टाळण्याचा सल्ला दिला जातो. सफरचंद, डाळिंब, द्राक्षे, अननस, चेरी, बदाम आणि लवंगा खाणे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे.

क्रमांक 4 : जे लोक 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मतात, त्यांचा गुरुग्रह राहू असतो. राहू हा ग्रह चढउतारांसाठी ओळखला जातो. हे लोक सहसा उदासीनता किंवा श्वसनाच्या विकारांसारख्या आरोग्याच्या समस्यांना तोंड देतात. ज्यामुळे त्यांना श्वासोच्छवास, सर्दी आणि खोकला, हृदयाच्या समस्या किंवा मूत्रसंसर्ग होतो. काही वेळा त्यांना असाध्य रोगांना तोंड द्यावं लागतं. या लोकांना गाजराचा रस, सफरचंदाचा रस आणि बीटरूटचा रस योग्य आहे. या लोकांनी सूर्यास्तानंतर फळे खावीत आणि चांदीच्या भांड्यांमधून अन्न घ्यावे. हे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. या लोकांनी राग आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्यासाठी जानेवारी, फेब्रुवारी, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे चांगले महिने नाहीत.

क्रमांक 5 : जे लोक 5, 14 आणि 23 व्या तारखेला जन्मतात त्यांचा गुरु बुध असतो. जास्त मानसिक तणावामुळे हे लोक सहसा घाबरून जातात. सर्दी, खोकला किंवा फ्लू, त्वचा विकार, मूत्रपिंड समस्या आणि निद्रानाश या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. मानसिक तणावामुळे स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते. आहारामध्ये गाजर, मुळा, पुदीना, हिरव्या भाज्या आणि जव हे रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यासाठी चांगले आहेत. अगदी लिंबूवर्गीय फळे देखील चांगली आहेत. जून, सप्टेंबर आणि डिसेंबर हे त्यांच्यासाठी चांगले महिने नाहीत.

क्रमांक 6 : जे लोक 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेत, त्यांचा गुरु शुक्र असतो. या लोकांना घबराट, नाक-घशाचे संक्रमण आणि वृद्धापकाळात फुप्फुस, हृदयाची समस्या, स्त्रियांना स्तनाशी संबंधित समस्या, साथीचा ताप किंवा इन्फ्लूएंझाचा त्रास होऊ शकतो. गोड, मसालेदार किंवा तेलकट पदार्थांपासून दूर रहा. अधिक हिरव्या भाज्या, काकडी, डाळिंब, बदाम आणि तांदूळ यांचे सेवन करा. हे त्यांच्यासाठी चांगले आहे. मे, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे महिने त्यांच्यासाठी तितके चांगले नाहीत.

क्रमांक 7 : जे लोक महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मतात, त्यांचा ग्रह केतू असतो. या तारखांना जन्मलेल्या लोकांना अपचन, चिंता, संसर्ग, वृद्धावस्थेतील संधिवात किंवा ब्लड सर्क्यूलेशन संबंधित आरोग्य समस्या असण्याची शक्यता आहे. या लोकांनी व्हिटॅमिन डी आणि ई घ्यावे. तसेच, ताज्या फळांचा रस घ्यावा. अनियमित खाण्याच्या सवयी आणि सर्वात महत्वाचे धूम्रपान, अल्कोहोल आणि ड्रग्स टाळा. जानेवारी, फेब्रुवारी, जुलै आणि ऑगस्ट हे महिने या लोकांसाठी अनुकूल नाहीत.

क्रमांक 8 : जे लोक महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मतात त्यांचा गुरु शनी असतो. रक्तदाब, दातदुखी, वारंवार डोकेदुखी, यकृत आणि आतड्यांसंबंधी काही विकारांशी संबंधित आजार हे लोकांच्या आरोग्याच्या समस्या आहेत. लवकर उठणे, व्यायाम करणे आणि ताजी हवा श्वास घेणे हे काही बदल आहेत जे त्यांनी त्यांच्या दैनंदिन दिनक्रमात समाविष्ट केले पाहिजेत. या लोकांनी मधाचे सेवन केले पाहिजे कारण ते त्यांच्यासाठी उत्तम मानले जाते. ते घरगुती ताकही पिऊ शकतात. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि जुलै हे या लोकांसाठी त्रासदायक महिने आहेत.

क्रमांक 9 : जे लोक 9, 18, 27 तारखेला जन्मतात त्यांचा गुरुग्रह मंगळ असतो. हे लोक अतिशय संवेदनशील असतात. मंगळ हा ग्रह डोके, चेहरा, मूत्रपिंड, गुडघे, मूत्राशय, पुनरुत्पादक अवयव आणि रक्ताभिसरण नियंत्रित करण्यासाठी ओळखला जातो. म्हणून, हे लोक ताप, कांजिण्या, मूत्रपिंडाचा त्रास, घशाशी संबंधित समस्या आणि ब्रोन्कियल ट्यूबसारख्या आरोग्याच्या समस्यांना बळी पडतात. ते व्यसनांनाही बळी पडतात, म्हणून त्यांना नशा टाळण्याचा सल्ला दिला जातो. एप्रिल, मे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने त्यांच्यासाठी अनुकूल नसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs BSP: खेळ राजकारणाचा! भाजप नेत्याच्या लेकाला मायावतींच्या पक्षाचे तिकीट

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांना आलेली धमकी पोकळ; घाबरण्याची गरज नाही.. गृह मंत्रालयाची माहिती

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Nashik Lok Sabha Constituency : नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांच्या दारी महाजन; बंद दाराआड सव्वा तास चर्चा

SCROLL FOR NEXT