nupur daithankar bag sakal
लाइफस्टाइल

समतोलाची गरज...

‘बाजी’ ही मालिका सुरू असतानाच मला आईपणाची चाहूल लागली. चित्रीकरण चार महिने आधीचं संपलं होतं; पण तरीही ती मालिका पुढचे चार महिने प्रसारित होत होती.

सकाळ वृत्तसेवा

- नुपूर दैठणकर-बाग

‘बाजी’ ही मालिका सुरू असतानाच मला आईपणाची चाहूल लागली. चित्रीकरण चार महिने आधीचं संपलं होतं; पण तरीही ती मालिका पुढचे चार महिने प्रसारित होत होती. ‘बाजी’ सुरू असताना आणि संपल्यानंतर मला चित्रपट आणि मालिकांच्या अनेक संधी येत होत्या. त्यावेळी मी ठरविलं होतं, की, दोन-तीन महिने ब्रेक घेऊन पुन्हा नव्या जोमाने काम करूयात; पण प्रेग्नंट असल्याचं समजलं, तेव्हा खूप आनंद झाला.

मी आई होणार, ही भावनाच खूप अनमोल होती. त्यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञांनी सल्ला दिला, की तू या क्षणी यशाच्या शिखरावर आहेस आणि तुला ते आत्मसात करण्याची संधी आहे. त्याचदरम्यान मला नृत्याच्या अनेक कार्यक्रमांची निमंत्रणंही येत होती; पण प्रेग्नंट असल्याचं लगेचच सांगायचं नव्हतं. त्यामुळे काही गोष्टी आम्ही ॲडजस्ट केल्या.

प्रेग्नन्सीच्या काळात मला अनेकदा नृत्याचे कार्यक्रम रद्द करावे लागले. त्यावेळी मला वाटायचं, की मी एकटी घरात बसली आहे आणि अख्खं जग काम करत आहे. त्याचदरम्यान कोरोनाचं संकट आलं आणि लॉकडाऊन लागला. त्यानंतर पुढील दोन वर्षं काहीही प्लॅनिंग केलेलं नसताना मला माझ्या मुलासाठी वेळ देता आला.

कारण, त्यावेळी सगळ्याच जगाला नाइलाजानं घरात बसावं लागलं होतं. ही दोन वर्षं आम्ही सर्वांनी मुलाबरोबर अतिशय आनंदानं घालवली आणि एन्जॉयही केली.

मी निर्णय घेतला होता, की माझा मुलगा रियांशला जेवढा वेळ देणं गरजेचं आहे, तेवढा वेळ मी देणार होते. त्यानंतर करिअरमध्ये पुन्हा येण्याचा निर्णय घेईन; पण कोरोनामुळे मला दोन ते अडीच वर्षांचा सलग वेळ मला मुलाला देता आला. त्यानंतर मी छोट्या-छोट्या ॲडफिल्मसही केल्या. नंतर जेव्हा पुन्हा करिअर सुरू केलं, तेव्हा प्रोजेक्ट घेताना प्रोजेक्टला किती वेळ देणं शक्य आहे, याचा विचार करून निर्णय घेत असे.

पुण्यात राहत असल्यानं मालिका करायच्या की नाही, हा निर्णय महत्त्वाचा होता- कारण मालिकांचं चित्रीकरण मुंबईत होतं. त्यावेळी मी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका केली. चित्रीकरणामुळे मी पाच-सहा महिने मुंबईत होते. मुलगा साडेतीन वर्षांचा होत. त्याची शाळाही सुरू झालेली होती. त्यामुळे मला सुट्टी मिळाली की पुण्यात येऊन त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवत असे. रियांशच्या सुट्टीच्या दिवशी माझा पती सौरभ त्याला मुंबईला घेऊन येत असे. मग आम्ही तिथं वेळ घालवायचो.

काही काळापूर्वी मी दोन महिने माझ्या नृत्याच्या कार्यक्रमासाठी ब्रिटन, अमेरिका, युरोप आणि कॅनडा दौऱ्या‍वर गेले होते. पहिल्यांदाच सलग दोन महिने मुलाला सोडून परदेशी राहू शकले. यासाठी माझ्या कुटुंबीयांचा मोलाचा पाठिंबा मिळाला. रियांशबरोबर पूर्णवेळ एक महिला मदतनीस होती, घरात स्वयंपाकालाही एक मदतनीस होती. विशेष म्हणजे त्या काळात रियांशनं स्वतः ला सांभाळून घेतलं, त्यामुळे मी बाहेर पडू शकले.

आईपणामुळे करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही, तर तुम्हाला कशाला जास्त महत्त्व द्यायचे आहे, हे ठरवावं लागतं. आपल्या वयानुसार आपण गोष्टी बदलत असतो. करिअरबरोबर मुलाच्या गोष्टींमध्येही लक्ष द्यावं लागतं. एक महत्त्वाची गोष्ट, प्रेग्नंट होण्यापूर्वी मी दोन कार्यक्रमांना होकार दिला होता.

त्यांना वर्षभरानंतरच्या तारखाही दिल्या होत्या. त्यामुळे ते कार्यक्रम मी चुकवू शकत नव्हते. पाचवा महिना असतानाही मी एक तास नृत्याचं सादरीकरण केलं. त्यापूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला. प्रेग्नंट असल्याचं आयोजकांनाही सांगितलं. मात्र, तासभर नृत्य करूनही ही गोष्ट रसिक प्रेक्षकांच्या लक्षात आली नाही.

करिअरिस्ट मुलींना कानमंत्र...

१) प्रेग्नंट असताना मदत घ्यायला लाजू नका. तुम्ही मूल सांभाळायला इतरांचीही मदत घेऊ शकता. त्यामुळे करिअर आणि मूल या गोष्टींचं गणित जुळवता येईल आणि तुमची तारांबळ होणार नाही.

२) मुल असो की करिअर, याबाबतचा निर्णय पती आणि तुम्ही दोघे मिळून घ्या. त्यामुळेच या गोष्टी सुरळीत पार पडू शकतात. यात वेळेचं नियोजन अतिशय महत्त्वाचं असतं. घरात असताना मुलाकडे पहा अन् काम करत असताना पूर्ण लक्ष कामाकडेच द्या.

३) प्रेग्नंट असताना शारीरिक, मानसिक बदल होतात, ही गोष्ट कुटुंबीयांना सांगा. त्यामुळे नऊ महिन्यांच्या काळाचा छान आनंद घ्या. आनंदी राहा आणि निरोगी जगा.

४) तुम्हीही एक माणूस आहात, ही गोष्ट लक्षात ठेवा. आई झाल्यानंतरही स्वतःला हक्काचा वेळ द्या. मुलाला वेळ देता येत नाही किंवा मला या गोष्टी करता येत नाहीत, अशी भावना मनात बाळगू नका. काही गोष्टी सकारात्मक वृत्तीने घ्या.

५) कुणालाही गृहीत धरू नका. आपलं दैनंदिन कामकाज कसं असेल, त्यानुसारच मुलाला वेगवेगळ्या सवयी लावा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Deshmukh: विधीमंडळात ज्या नितीन देशमुखांना मारहाण झाली ते नेमके कोण आहेत?

Kolhapur Killing Case : रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन बेनाडेचा खून, संशयित आरोपी पोलिसांना शरण; संकेश्र्वरात मृतदेहाचा शोध सुरू

Morning Diet: सकाळी रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत? डॉक्टरांनी सांगितले कारण

मे-जूनमध्ये शेतीत काम नसतं, शेतकरी रिकामेच असतात.. तेव्हा गुन्हेगारी वाढते; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं विधान

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची कर्जप्रकरणे थंडबस्त्यात; अण्णाभाऊ साठे महामंडळातील वास्तव,नागपुरात केवळ एकाच महिलेला कर्ज!

SCROLL FOR NEXT