Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : लांब आणि घनदाट केसांसाठी ऑलिव्ह ऑईलपासून बनवा ‘हे’ हेअरमास्क

केसांना योग्य पोषण मिळावे आणि केस मुलायम रहावेत यासाठी आपण केसांना तेल लावतो. खोबरेल तेल, बदाम तेल यासोबतच केसांसाठी ऑलिव्ह ऑईल देखील फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care Tips : केसांना योग्य पोषण मिळावे आणि केस मुलायम रहावेत यासाठी आपण केसांना तेल लावतो. खोबरेल तेल, बदाम तेल यासोबतच केसांसाठी ऑलिव्ह ऑईल देखील फायदेशीर आहे. केसांना ऑलिव्ह ऑईल लावल्याने केसांना अनेक फायदे होतात.

ऑलिव्ह ऑईल या तेलामध्ये मॉईश्चरायझिंग गुणधर्म असतात. त्यामुळे, हे तेल घनदाट आणि लांब केस बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन ई आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडचा समावेश आढळून येतो. हे गुणधर्म केसांना पोषण देतात.

लांब आणि घनदाट केसांसाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलपासून हेअर मास्क बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या हेअर मास्कबद्दल.

ऑलिव्ह ऑईल आणि अंड्याचा हेअरमास्क

भरपूर प्रोटिनने युक्त असलेला हा हेअरमास्क बनवण्यासाठी २ अंड्यांमधील पिवळा बल्क घ्या. आता या पिवळ्या बल्कमध्ये ३ चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळा. आता या मिश्रणात १ चमचा दही आणि लिंबाचा रस घाला. २० ते २५ मिनिटे केसांवर हा हेअर मास्क लावा. त्यानंतर, केस धुवून टाका. अधिक चांगल्या परिणामांसाठी केसांना हा हेअर मास्क आठवड्यातून २ वेळा लावा.

ऑलिव्ह ऑईल आणि नारळाच्या तेलाचा हेअरमास्क

केसांच्या वाढीसाठी तुम्ही केसांवर या दोन्ही तेलांचा वापर करू शकता. एका बाऊलमध्ये नारळाचे तेल घ्या. त्यानंतर, त्या तेलाच्या निम्मे ऑलिव्ह ऑईल त्यात मिसळा. आता हे दोन्ही तेल एकत्रपणे मिक्स करून गरम करा. त्यात हवे असल्यास तुम्ही कापूर देखील घालू शकता.

तेल कोमट झाल्यावर या तेलाने केसांवर छान मसाज करा. त्यानंतर, १ तासाने केस धुवून टाका. या हेअर मास्कचा वापर केल्याने केसगळती कमी होते आणि केसांची योग्य प्रकारे वाढ होण्यास मदत होते. अधिक चांगल्या परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून २ वेळा या हेअरमास्कचा वापर करू शकता.

ऑलिव्ह ऑईल आणि मधाचा हेअरमास्क

हा हेअरमास्क केसांना लावल्याने केस चमकदार आणि मऊ होण्यास मदत होते. शिवाय, केस गळती कमी होऊन केसांच्या वाढीसाठी हा हेअरमास्क फायदेशीर ठरतो.

हा हेअर मास्क बनवण्यासाठी ५ चमचे ऑलिव्ह ऑईल घ्या आणि त्यामध्ये ३-४ चमचे मध घालून तुम्ही त्यापासून हेअरमास्क बनवू शकता. हा हेअरमास्क केसांवर अर्ध्या तासासाठी लावा त्यानंतर केस धुवून टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर

Prashant Kishor on Bihar Election: अखेर प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण सांगितलं, म्हणाले..

पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय! सोलापूर शहरात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नाकाबंदी; प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत एक विशेष पथक

Baidpura Violence : गोमांस विक्रीच्या संशयावरून दोन गट आमनेसामने; दोन्ही गटाकडून तक्रारी, अदखलप्राप्त गुन्हे दाखल

Pune Traffic : पुणे-सातारा बाह्यवळण मार्गावर दिवाळीच्या गर्दीत वाहतूक कोंडीचा कहर

SCROLL FOR NEXT