लाइफस्टाइल

Health Care News : उच्च रक्तदाबाची समस्या दूर करण्यासाठी आहारात करा कांद्याचा समावेश..

सकाळी रिकाम्यापोटी प्या कांद्याचा ज्यूस, हाय ब्लड प्रेशरची समस्या होईल दूर

Aishwarya Musale

आजकाल हाय ब्लड प्रेशरची समस्या केवळ जास्त वयाच्या व्यक्तींनाच नाही तर तरुणांना देखील होऊ लागली आहे. ब्लड प्रेशर वाढणे आणि कमी होणे या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नसतात. हेल्दी लेव्हलवर, शरीरातील रक्तदाब 120/80 मिमी एचजी असतो, परंतु जेव्हा रक्तदाब या पातळीपेक्षा जास्त असतो, तेव्हा आपण त्याला उच्च रक्तदाब म्हणून ओळखतो.

हृदयविकाराच्या झटक्याला उच्च रक्तदाब मोठ्या प्रमाणात जबाबदार असतो. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोक औषधांची मदत घेतात, पण तुम्ही तुमच्या आहारात बदल करून रक्तदाबही नियंत्रित करू शकता. आज आम्ही तुम्हाला तज्ञांनी सांगितलेल्या एका खास उपायाविषयी माहिती देत ​​आहोत, ज्याचे पालन केल्याने बीपी नियंत्रणात ठेवता येईल.

तज्ज्ञांच्या मते हाय बीपीमध्ये कांदा खाणे फायदेशीर ठरू शकते. होय, आत्तापर्यंत तुम्ही जेवणाची चव वाढवण्यासाठी कांद्याचा वापर करत असाल, परंतु तुम्ही जर बीपीचे रुग्ण असाल तर तुम्ही फायद्यासाठी देखील कांद्याचे सेवन करू शकता. कांद्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी यासह अनेक गुणधर्म असतात जे बीपी नियंत्रित करण्यास मदत करतात.

कांद्याचे सेवन कसे करावे

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना कच्चा कांदा खाल्ल्यानेच फायदा होतो. जेव्हा तुम्ही गॅसवर कांदा शिजवता तेव्हा त्यातील सर्व पोषक तत्वे नष्ट होतात. अशा परिस्थितीत तुम्ही कांद्याचा सॅलड  आणि रायता तयार करून खाऊ शकता. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला केवळ कांद्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. तसेच तुमच्या डॉक्टरांनी दिलेले औषध घ्या.

कांद्याच्या ज्यूसचे फायदे

कांद्याचा फ्रेश ज्यूस प्यायल्याने देखील हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येऊ शकते. कांद्यात असणाऱ्या क्वेरसेटिन नावाचा फ्लेवोनोइड ऑक्सीडेटिवमुळे शरीराला अनेक लाभ मिळतात. कांद्याच्या ज्यूसमुळे डायबेटिज देखील नियंत्रणात येते. कांद्यात आढळणारे गुणधर्म पचनक्रिया चांगली ठेवण्यास, रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास आणि शरीराला विविध प्रकारच्या इंफेक्शनपासून वाचवण्यास मदत करते. तसेच कांद्याचा ज्यूस हा केसांसाठी देखील फायदेशीर ठरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT