Oscar 2024 esakal
लाइफस्टाइल

Oscar 2024 : एम्मा ते मार्गोटच्या रेड कार्पेट लूकची चर्चा! कॅमेऱ्यांचा क्लिकक्लिकाट अन् चाहत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण

Oscar 2024 : हॉलिवूडसोबतच जगभरातील सिनेप्रेमी ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात, तो ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच लॉस एंजेलिसमध्ये पार पडला.

Monika Lonkar –Kumbhar

Oscar 2024 : हॉलिवूडसोबतच जगभरातील सिनेप्रेमी ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात, तो ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच लॉस एंजेलिसमध्ये पार पडला. लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये या ९६ व्या ऑस्कर २०२४ चे आयोजन करण्यात आले होते.

ऑस्कर हा चित्रपट जगतातील सर्वात महत्वाचा पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार जिंकण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यंदा या पुरस्कार सोहळ्यात अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि इतर कलाकारांचे ऑस्कर जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. या सोहळ्यात जगभरातील सुप्रसिद्ध स्टार्सने उपस्थिती दर्शवली होती.

या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अनेक अभिनेत्रींनी ग्लॅमरस लूकमध्ये हजेरी लावली होती. यातील काही अभिनेत्रींचे लूक्स खूपच चर्चेत आले आहेत. कोणत्या आहेत त्या अभिनेत्री? चला तर मग जाणून घेऊयात.

एम्मा स्टोन

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या कॅटेगिरीतील ऑस्कर पुरस्कारावर अभिनेत्री एम्मा स्टोनने मोहोर उमटवली. पुरस्कार तर तिने जिंकलाच मात्र, तिचा पांढऱ्या रंगाचा गाऊन जास्त चर्चेत आला. या व्हाईट गाऊनमध्ये एमा खूपच सुंदर दिसत होती. अगदी बाहुलीप्रमाणे ती या ड्रेसमध्ये दिसत होती. मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि  गळ्यातील स्टोन ज्वेलरी जास्त उठून दिसत होती.

मार्गोट रोबी

बार्बी या प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटाची अभिनेत्री मार्गोट रॉबीने या पुरस्कार सोहळ्याला काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये हजेरी लावली होती. तिच्या या ब्लॅक लेडीलूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

या ब्लॅक गाऊनवर तिने मोकळे केस सोडले होते आणि मिनिमल मेकअप लूक कॅरी केला होता. या लूकमध्ये मार्गोट खूपच सुंदर दिसत होती.

लीजा कोशी

ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला अभिनेत्री लीसा कोशीने लाल रंगाच्या सुंदर आऊटफीटमध्ये उपस्थिती दर्शवली होती. लीजाने लाल रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

स्टेटमेंट एअररिंग्स, केसांची अनोखी हेअरस्टाईल आणि मिनिमल मेकअप लूकमध्ये लीजा खूपच ग्लॅमरस दिसत होती. तिच्या आऊटफीटबद्दल सांगायचे झाल्यास तिच्या या लाल रंगाच्या ऑफ शोल्डरच्या स्लीव्हज या गुलाबाच्या आकारातील होत्या, ज्या जास्त लक्ष वेधून घेत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT