कोल्हापूर : वय वाढत जाणे ही एक अशी प्रक्रिया आहे की त्यापासून कोणीही वाचू शकत नाही. वय वाढत जात असताना सगळ्यात जास्त परिणाम होतो तो आपल्या त्वचेवर. त्वचेवर सुरकुत्या येण्यास सुरु होतात, त्वचा काळवंडते त्याचबरोबर विविध बदल दिसू लागतात. आपली त्वचा सैल पडू लागते आपल्या काही चुकांमुळे. यासाठी परफेक्ट टोनिंग ठेवण्यासाठी काही बदल करणे आवश्यक आहे.
हे बदल आपल्या लाइफस्टाइल मधूनच होऊ शकतात जे आपल्या त्वचेवर परिणाम करतात. अनेक टिप्स या त्वचेच्या उपायासाठी दिले जातात अनेक उत्पादने ही असतात परंतु त्यामध्ये आपली जीवनशैली बदलणे खूप गरजेचे असते आपण या ठिकाणी अशा पद्धतीचा पद्धतीची माहिती घेऊया आपली त्वचा अधिक चांगली ठेवू शकते.
1) क्लींजिंग सोबत ठेवा काळजी
जर तुमचे वय 30 पेक्षा अधिक झाले असेल तर तुम्हाला क्लींजिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. या ठिकाणी फक्त गुलाब पाण्याने किंवा नॉर्मल फेसवॉश द्वारे चेहरा स्वच्छ करण्याची गोष्ट नाही. कोरियन स्किन केअर रूटीनमध्ये क्लींजिंग हे आवश्यक गोष्ट बनली आहे. या कारणामुळे कोरियन स्किन केअर आता संपूर्ण विश्वात अधिक पसंत केले जाते. चेहऱ्याच्या क्लींजिंग साठी आपण घरगुती उपचार वापरू शकतो. तसेच क्लींजिंग मुळे आपली त्वचा नाजूक बनते आणि त्वचेचे चित्र खुले राहतात. तुम्हाला कोणतीही समस्या असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने क्लींजिंग सुरू करा.जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही क्लींजिंग साठी फेशियल ऑइल चा वापर करू शकता कोरियन स्किन केअर मध्ये हे एक बहुत गुणकारी ठरते
2) आठवड्यात एवढ्या वेळा करा व्यायाम
एका अहवालानुसार आठवड्यातून कमीत कमी चार वेळा व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराला व त्वचेला फायदा होतो. आपल्या कामातून रक्ताचे प्रसरण योग्यरीत्या होते आणि या कारणामुळेच शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडतात. त्याच पद्धतीने त्वचेतील छिद्र द्वारे अनावश्यक घटक बाहेर येतात. योग्य पद्धतीने जर आपण वर्क आउट केले तर त्वचेला अधिक फायदा होतो. जेवढ्या प्रमाणात आपल्या शरीरातून घाम बाहेर येईल तेवढ्या प्रमाणात आपले त्वचेची छिद्रे ऍक्टिव्ह होतात. उत्तम त्वचेसाठी व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ आपले वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर आपल्या त्वचेसाठी सुद्धा तुम्ही व्यायाम करावे.
3) नैसर्गिक ब्युटी प्रोडक्ट चा उपयोग करा:
अनेक वेळा आपण वापरत असलेले कॉस्मेटिक आपल्या त्वचेला अधिक नुकसान पोहोचवतात. मार्केटमध्ये मिळणारे अनेक ब्युटी प्रॉडक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात. प्याराबेन केमिकल आणि सल्फेट जे कॉस्मेटिक मध्ये वापरले जातात ते स्किन चे आयुष्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात. आपण नैसर्गिक उत्पादन आधारे आपला चेहरा अधिक चांगला करू शकतो.
4 अॅटी एक्सीडेंट असणारा पदार्थ भरपूर खा
खाण्यापिण्याच्या सवयी मुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. जर तुमची त्वचा लवकर आकसते. जर तुमची त्वचा असलेली दिसत असेल तर त्याचे कारण तुम्हाला योग्य आहार मिळत नाही आणि तुम्ही ज्यादा तेल आणि मसाले पदार्थ पदार्थ खाता अशावेळी तुमची त्वचा तुमचे वय अधिक दाखवते. जर तुम्ही अँटीॲक्सिडेंट असणारी फळे भरपूर खाल्ला तर त्याचा परिणाम लगेच दिसतो. हे पदार्थ चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करतात. यासाठी तुम्ही काही वेगळे असे करण्याची गरज नाही. फक्त ग्रीन टी, गाजर, पालक, दूध, समुद्र फळे अशा पदार्थांचा आपल्या खाण्यामध्ये समावेश करा.
5 सिगरेट ओढण्या वर ठेवा ताबा:
तंबाखू कोणत्याही प्रकारे सेवन केला तरी ते तुमच्या त्वचेला अधिक हानी पोहोचवते. आपल्या शरीरासाठी तंबाखू अत्यंत हानिकारक ठरते. तुम्ही तंबाखूचे सेवन कशा प्रकारे करता त्यावर चेहऱ्यावरील समस्या अधिक दिसू लागतात. तंबाखू बरोबर मध्यपान बरोबर नाही. जर तुम्ही अधिक वेळेपासून मद्यपान करत असाल तर त्वचेचे अशा पद्धतीने नुकसान होते की जे कोणत्याही उपचाराने भरून निघत नाही. यासाठी तुम्ही याचे सेवन न करणे उत्तम.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.