विवाहित महिला या दिवशी पतीला अभ्यंगस्नानानंतर औक्षण करतात. त्या बदल्यात त्यांचे पती ओवाळणीत काही भेटवस्तू किंवा दागिना देतात अशी प्रथा आहे.
दोन दिवसांपासून दिवाळीला सुरुवात झाली असून सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात नवा आनंदोत्सव म्हणून या सणाकडे पाहिले जाते. दिवाळीत आजच्या तिसऱ्या दिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते. दरम्यान उद्या म्हणजेच चौथ्या दिवशी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा केल्या जाणाऱ्या दिवसाला 'दिवाळी पाडवा' (Diwali Padwa) असे म्हणतात. याला 'बलिप्रतिपदा' असंही संबोधलं जातं. साडेतीन मूहुर्तापैकी एक म्हणून साजरा होणार हा दिवस शुभमुहूर्तांपैकी एक असतो. विवाहित महिला या दिवशी पतीला अभ्यंगस्नानानंतर औक्षण करतात. त्या बदल्यात पती ओवाळणीत काही भेटवस्तू किंवा दागिना देतात अशी प्रथा आहे.
मात्र सध्या बदलत्या काळाबरोबर या भेटवस्तूही बदलल्या आहेत. बाजारात नव्याने आलेल्या अनेक उपयोगी वस्तू तुम्ही भेट म्हणून पत्नीला देऊ शकता. बायकोला अशी काही स्पेशल भेटवस्तू द्यायची असेल तर, काही आयडीया तुम्हाला उपयोगी पडू शकतात. या वेगवेगळ्या गॅजेट्संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत.
दागिने (Jewellery) -
सध्याच्या फास्ट लाईफमध्ये अनेक स्त्रिया इमिटेशन ज्वेलरीला वापरतात. जर तुम्हाला इमिटेशन ज्वेलरी घ्यायची असेल तर बाजारातील काही चांगल्या ब्रँड्सचे तुम्ही घेऊ शकता. याशिवाय सोन्याच्या दागिन्यांमध्ये तुम्ही नामांकित काही ज्वेलर्स शॉप ना भेट देऊ शकता. तुम्हाला सोन्या-चांदीचे नवीनतम आणि आकर्षक असे कलेक्शनही येथे मिळतील. जर तुमच्या पत्नीस हि-यांची आवड असेल तर या ब्रँडमध्ये तुम्हाला हि-यांचे दागिन्यांचेही उत्तम कलेक्शन मिळेल.
गॅजेट्स - (Gadgets)
सध्या वाढत्या ऑनलाईन, डिजिटल युगात आधुनिक तंत्रज्ञानात सगळे गुंतून आहेत. महिलांनाही या आधुनिक तंत्रांचे वेडं आहे. महिलांचा अशी अनेक नवीन गॅजेट्स खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. यात मोबाईल्स, ब्लूटुथ, सारेगमपा कारवा अशा गॅजेट्सचा समावेश होतो. तुमची पत्नी यातील एखादी वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
रोमँटिक टूर प्लॅन (Romantic Tour) -
दोन ते अडीच वर्षानंतर लॉकडाऊन शिथिल झाले आहे. त्यामुळे पर्यटनस्थळेही सुरु झाली आहेत. जर तुम्ही पत्नीला कुठे फिरायला घेऊन गेला नसाल तर या सुट्टीत एखादी टूर प्लॅन करु शकता. त्यासाठी प्रवास तिकिटांपासून हॉटेल बुकिंगपर्यंत सर्व फायनल करुन ते तिकिट्स तिच्या हातात दिलात तर हे एक उत्तम पाडव्याचे गिफ्ट होऊ शकेल.
सौंदर्यप्रसाधने -
महिलांना सौंदर्यप्रसाधने (मेक-अप) चे प्रॉडक्ट प्रिय असतातच. कोणत्याही घरगुती समारंभात किंवा काही इव्हेंट्समध्ये मेकअप करुन जावे लागते. पार्टी, सण, समारंभ असला तर महिलांना साजशृंगार करुन त्यासोबत सौंदर्यप्रसाधनांचा वापर करायला आवडते. अशावेळी बाजारात मिळणारे ब्रँडेड किंवा तुमच्या बजेटमधील सौंदर्यप्रसाधने तुम्ही तुमच्या पत्नीस गिफ्ट म्हणून देऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.