Pakistan’s Vada Pav Girl:  Sakal
लाइफस्टाइल

Pakistan’s Vada Pav Girl: खातो की नेतो? दिल्ली नंतर आता पाकिस्तानमधील वडापाव दिदी झाल्या व्हायरल, चक्क ८० रुपयांचा वडा...

Pakistan’s Vada Pav Girl: दिल्लीतील रस्त्यांवर वडापावची गाडी चालवणारी चंद्रिकाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पाकिस्तानमधील कविता दिदीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Puja Bonkile

Pakistan’s Vada Pav Girl: आजकाल सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायर होत असतात. सध्या दिल्लीतील वडापाव गर्ल चंद्रिका कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. पण अलिकडेच सोशल मिडियावर पाकिस्तानमधील कविता दीदी वडापाव आणि पावभाजी बनवण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पाकिस्तानमधील कँट स्टेशनजवळील एका गजबजलेल्या रस्त्यावरचा आहे. येथे कविता आणि तिचे कुटुंब थेट भारतातील प्रसिद्ध स्ट्रीट फुड वडापाव आणि पावभाजी विकतात. हा वडापाव ८० रुपयाला मिळतो.

हा व्हिडिओ @karamatkhan_05 ने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तुम्ही जर कराचीमध्ये असाल किंवा जाण्याचा विचार करत असाल तर कविताची पावभाजी आणि वडापावची चव चाखायला विसरू नका.

एम रहमान व्हिलॉगद्वारे 15 एप्रिल रोजी युट्युबवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये लोकांना कविताच्या वडापाव आणि पावभाजीबद्दल प्रथम माहिती दिली जाते. तिला हे पदार्थ बनवायला आवडतात. कविताने व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितले होते की तिचा स्टॉल रमजानच्या पवित्र महिन्यातही सुरू होता. अनेक लोक पावभाजी आणि वडापावचा आस्वाद घेण्यासाठी येत होते.

@karamatkhan_05 च्या इन्साग्राम व्हिडिओवर अनेक यूजर्संनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. एका यूजरने लिहिले की, 'सर्व पाकिस्तानींनी आमच्या बहिणीला सपोर्ट करायला हवा.' दुसरा यूजर म्हणाला, “खूपच छान! भारतीय पदार्थाला पाकिस्तानमध्ये एवढे प्रेम मिळते हे पाहून खुप आनंद झाला आहे. तिसऱ्या यूजरने लिहिले की 'ही मुलगी दिल्ल्लीच्या व्हायरल वडापाव गर्लपेक्षाही चांगली आहे. '

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT