Ashadhi Ekadashi 2024 sakal
लाइफस्टाइल

Ashadhi Ekadashi 2024 : यंदाच्या आषाढी एकादशीला असा असेल विठ्ठल रुक्मिणीचा भरजरी पोशाख!

यंदा 17 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होत असून यासाठी 18 ते 20 लाख भाविक पंढरीच्या समीप पोहचली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात आषाढी एकादशी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यंदा 17 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होत असून यासाठी 18 ते 20 लाख भाविक पंढरीच्या समीप पोहचली आहेत. तुम्हाला माहित आहे का? आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रुक्मिणीचा भरजरी पोशाख बेंगलोर येथून बनविण्यात आला आहे. विठुरायाला भगव्या रंगाची मखमली अंगी बनविण्यात आली असून यावर संपूर्णपणे हाताने भरजरीत कलाकुसर करण्यात आली आहे.

देवाला बंगलोरी सिल्कचे अतिशय मुलायम असे सोवळे आणण्यात आले असून त्यावर भगव्या रंगाचाच मखमली शेला परिधान केला जाणार आहे. रुक्मिणी मातेलाही सिल्कची सुंदर अशी नऊवारी साडी बनवून बेंगलोर येथून आणण्यात आल्याचे मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

तसेच आषाढीला मंदिर समितीकडून होणाऱ्या देवाच्या नित्यपूजेत हा सुंदर पोशाख परिधान करण्यात येणार आहे. तसेच होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री यांच्याकडून खास पोशाख देखील आणला जाणार आहे. महापूजेनंतर तो पोशाख देवाच्या नागावर परिधान केला जाणारे आहे

यंदा आषाढी एकादशी येत्या 17 जुलै 2024 ला साजरी होणार आहे. हिंदू पंचागानुसार आषाढी एकादशीचा तिथी 16 जुलै रोजी रात्री 08:33 वाजता सुरू होणार आहे. आणि 17 जुलै रोजी रात्री 09:02 वाजता समाप्त होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार आषाढी एकादशी 17 जुलैला साजरी होणार आहे. 

या दिवशी विठुरायाची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. उपवास केला जातो. आषाढी एकादशीची तिथी हिंदू धर्मांमध्ये सर्वात पवित्र आणि महत्वाची मानली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reverse Mortgage Loan: बँक दरमहा EMI भरणार; कर्जाची रक्कम परत करण्याचंही टेन्शन नाही

Latest Marathi News Live Updates : प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला भीषण आग, सर्व प्रवासी सुखरुप

Kolhapur Circuit Bench: 'सरन्यायाधीशांनी जिंकली सर्वांची मने'; सर्किट हाऊसवर दोन तासांहून अधिक काळ गाठीभेटी

Income Tax 2025: प्राप्तिकर कायद्यातील महत्त्वाचे बदल

Kalhapur Rain update: 'काेल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार'; पंचगंगेच्या पातळीत वाढ, २१८ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले

SCROLL FOR NEXT