Paneer Pakoda Recipe  esakal
लाइफस्टाइल

Paneer Pakoda Recipe : छोट्या भुकेचा मोठा फॉर्म्युला, दहा मिनिटात तयार होणारे पनीर पकोडे

सायंकाळच्या भुकेवर हे पकोडे म्हणजे परफेक्ट सोल्युशन आहेत, कारण हे पौष्टीकही आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Paneer Pakoda Recipe :

दुपारचे जेवण केल्यानंतर आपण थेट पाच किंवा सहा वाजता चहा घेतो. प्रत्येक भारतीय व्यक्ती ऑफिसमध्ये असो वा घरी चहाच्या वेळेला चहा घेतोच. कारण दुपारचं आणि रात्रीचं जेवणं यात बराच वेळ निघून गेलेला असतो. त्यामुळे सायंकाळच्या वेळी भूक लागलेली असते.

या छोट्या भुकेला सहज पचेल आणि त्रासही होणार नाही असे काहीतरी खायला हवे. बरं पाणीपुरी, चाट हेच पदार्थ खाण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे, नवं काहीतरी शोधत असाल तर पटकन तयार होणारे पनीर पकोडे तुम्ही नक्की ट्राय करायला हवेत. सायंकाळच्या भुकेवर हे पकोडे म्हणजे परफेक्ट सोल्युशन आहेत, कारण हे पौष्टीकही आहेत. (Paneer Pakoda Recipe)

साहीत्य -

पाव किलो पनीर मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून, १ वाटीभर हरभरा डाळीचे पीठ (बेसन), १ टे. स्पून तांदूळ पिठी, १ टी स्पून लाल तिखट, मीठ, पाव टी स्पून खायचा सोडा, १ टी स्पून लिंबाचा रस, चिमूटभर ओवा, तेल

कृती :

बाऊलमध्ये डाळीचे पीठ, तांदुळाची पिठी, तिखट, मीठ, ओवा घालून सरसरीत भिजवून १५ ते २० मिनिटे झाकून ठेवावे.

वरिल पिठात पाव चमचा सोडा व लिंबाचा रस घालून फेटून त्यात पनीरचे तुकडे बुडवून कढईत तेल तापवून पकोडे तळावेत. हिरवी पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

Coastal Road: वेगमर्यादा, प्रवेशबंदी आणि प्रवेश मार्ग; कोस्टल रोड, सी लिंकवरील वाहतुकीसाठी नवे नियम जारी

Marathi News Live Updates : गांजा खरेदी करण्यासाठी पैशाचा पुरवठा करणाऱ्या कोल्हापुरातील दोन महिलांना पोलिसांनी केली अटक

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

SCROLL FOR NEXT