Paper Bags Sakal
लाइफस्टाइल

Paper Bags: कागदी शॉपिंग बॅगचा रंग ब्राऊन का असतो? जाणून घ्या कारण

Paper Shopping Bags: जेव्हाही आपण बाजारात किंवा मॉलमध्ये जातो तेव्हा खरेदी केल्यानंतर आपल्याला कागदी पिशव्यांमध्येच वस्तू दिल्या जातात. पण या पिशव्यांचा रंग ब्राऊन का असतो हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

know about why paper shopping bags in brown color

बाजारातून वस्तू किंवा भाजीपाला आणण्याासाठी सर्वच लोक पिशवीचा वापर करतात. अनेक लोक बाजारात मिळणाऱ्या पिशवीचा वापर करतात. यालाच शॉपिंग पेपर बॅग किंवा ब्राऊन पेपर बॅग देखील म्हणतात.

अनेकांनी शॉपिंग पेपर बॅगचा अनेकदा वापर केला असेल. जेव्हाही बाजारात किंवा मॉलमध्ये जातो तेव्हा खरेदी केल्यानंतर आपल्याला कागदी पिशव्यांमध्येच वस्तू दिल्या जातात. अनेक दुकाने किंवा मॉलमध्ये मिळणाऱ्या कागदी पिशव्यांचा रंग ब्राऊन असतो. पण यामागे कोणते कारण आहे हे जाणून घेऊया. वस्तू ठेवण्यासाठी सर्वजण कागदी पिशव्या वापरतात. शॉपिंग बॅगपासून ते गिफ्ट बॅगपर्यंत सर्वांचा रंग सारखाच असतो. पण तुम्ही विचार केला आहे का की प्रत्येक बॅग या एकाच रंगाची का बनवली जाते?

  • कोणते आहे कारण?

पेपर, टिश्यू पेपर, पुस्तके, टॉयलेट पेपर इत्यादी बनवण्यासाठी झाडांचा वापर केला जातो हे आपणा सर्वांना माहीत आहे. हे झाडे कापून तयार केले जातात. यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. शॉपिंग पेपर बॅग टाकावू वस्तूंपासून बनवल्या जातात. शॉपिंग पेपर बॅग बनवण्यासाठी कार्डबोर्डचा वापर केला जातो. क्राफ्ट पेपर बॅग ही बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम बॅगांपैकी एक आहे. अनेक डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि किराणा दुकाने या बॅगचा वापर करतात. या पिशव्या साध्या आणि ब्राऊन क्राफ्टपासून बनवल्या जातात, ज्यावर ब्लीच केलेले नसते. या कागदी पिशव्या क्राफ्ट पेपर किंवा रिसायकल केलेल्या कागदापासून बनवल्या जातात.

  • कंपोस्ट करणे सोयास्कर

प्लास्टिक पिशव्या नष्ट करणे अवघड आहे. प्लास्टिकऐवजी पेपरलसहज नष्ट होतो. या पेपर बॅगचे छोटे तुकडे करून त्यात शेण आणि माती मिक्स करावी. यामुळे हळूहळू ते मातीत मिक्स होईल आणि कंपोस्टमध्ये बदलेल.

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Crime: पारधमध्ये ‘लव्ह जिहाद’! दहा वर्षांपासून पीडितेवर अत्याचार, जालन्यातून दोन संशयित अटकेत!

Ganga Godavari Maha Aarti : नाशिकमध्ये आज गंगा-गोदावरी महाआरती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा, वाहतुकीत मोठे बदल

Latest Marathi News Live Update : कासा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार,रोहित पवारांनी घेतली पीडितेच्या कुटुंबाची भेट

Pavitra Portal News: ‘पवित्र’ पोर्टलचा गोंधळ! निवड होऊनही ८०% शिक्षक रुजू नाहीत, विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीवर!

Palghar Road Construction Delay : गुजरातला जोडणारा महत्त्वाचा मार्ग संकटात! कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT