Child Health  sakal
लाइफस्टाइल

Child Health : मुलांच्या आहारात 'या' 4 गोष्टींचा करा समावेश, हाडे होतील मजबूत...

मुलांच्या आहारात 'या' 4 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या

Aishwarya Musale

आपल्या सर्वांना माहित आहे की व्हिटॅमिन डी आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि या जीवनसत्वाचा सर्वोत्तम स्त्रोत सूर्यप्रकाश आहे. हिवाळ्यात मुलं कमी घराबाहेर पडतात. त्यामुळे त्यांच्या हाडांना खूप नुकसान होऊ शकते.

अशा परिस्थितीत, मुलांची व्हिटॅमिन डीची गरज पूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे ज्यामध्ये व्हिटॅमिन डी भरपूर आहे. मुलांच्या चांगल्या विकासासाठी त्यांच्या आहारात कोणते पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत ते जाणून घेऊया.

अंडी

किड्स हेल्थच्या अहवालानुसार, जर तुमच्या मुलाला दूध आवडत नसेल आणि त्याला अंडी आवडत असतील, तर त्याला अंडी खायला द्या. होय, दुधाप्रमाणेच अंड्यामध्येही व्हिटॅमिन डी भरपूर असते. अंड्याचा पांढरा भाग, ज्याला एग व्हाईट देखील म्हणतात, त्यात पुरेसे प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. अशा परिस्थितीत त्यांना दररोज एक अंडे खायला द्यावे.

दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा

हाडे मजबूत करण्यासाठी दररोज एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. व्हिटॅमिन डीचे चांगले प्रमाण असलेले दुसरे दुग्धजन्य पदार्थ म्हणजे 'पनीर'. तुम्ही मुलांना स्नॅक्स म्हणून देऊ शकता. बऱ्याच मुलांना पनीर खूप आवडतं. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना चपाती सोबत ते देखील देऊ शकता. तिसरे दुग्धजन्य पदार्थ ज्यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते ते म्हणजे दही. मुलांना भरपूर दही खायला द्या आणि त्यांना निरोगी ठेवा.

संत्र्याचा रस खूप फायदेशीर आहे

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. पण खूप कमी लोकांना माहित आहे की त्यात व्हिटॅमिन डी देखील मुबलक प्रमाणात आढळते. मुलांनी रोज एक संत्री खाल्ल्यास किंवा एक ग्लास संत्र्याचा रस प्यायल्यास त्यांच्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळतो. व्हिटॅमिन सी सोबत, फोलेट आणि पोटॅशियम देखील संत्र्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळते, जे मुलांच्या चांगल्या विकासासाठी खूप फायदेशीर आहे.

मशरूम

तुम्ही तुमच्या मुलाच्या दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात मशरूमचा समावेश केला पाहिजे. यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी केवळ लहान मुलेच नाही तर प्रौढ देखील त्यांच्या आहारात मशरूमचा समावेश करू शकतात. यामुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait : होर्मुझ तणाव पेटला! भारतीय जहाजावर गोळीबारानंतर मोदी सरकारचा राग उफाळला; इराणी राजदूतांना समन्स

Senior Living Athashri: परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ला रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती; वडोदऱ्यात सहा हजाराव्या ज्येष्ठ रहिवाशाला घराचा ताबा

Satara Politics: पाटणच्या पाणीप्रश्नावरून शंभुराज देसाईंचा पाटणकरांना अप्रत्यक्ष टोला; ठेकेदार व अधिकाऱ्यांना तात्काळ कामाला लावण्याचे निर्देश

SRH vs CSK Live: संजू सॅमसनचा एक निर्णय अन् गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याने हैदराबादचे नशीब बदलून टाकले; चेन्नईने कमबॅक केले

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SCROLL FOR NEXT