लाइफस्टाइल

Baby Care Tips: बाळाची नखं कापताना लक्षात ठेवा या गोष्टी, येणार नाही अडचण

लहान बाळांची त्वचा खूप मऊ असते. अशा वेळी नखे कापताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Aishwarya Musale

बाळाची नखे कापणे हे खूप अवघड काम आहे. लहान मुलांची नखे कापताना ते हात-पाय हलवत राहतात, त्यामुळे त्यांना इजा होण्याचा धोका असतो. या कारणास्तव बहुतेक पालक आपल्या मुलांचे नखे कापण्याचे टाळतात.

बाळांच्या नखात घाण साचते आणि त्यांनी तोंडात बोट घातल्यास संसर्ग होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत, बाळाची नखे वेळोवेळी कापली जाणे महत्वाचे आहे. हे अवघड काम सोपे कसे करता येईल ते जाणून घेऊया.

आंघोळ करताना नखे ​​कापा :

आंघोळ करताना मुलाची नखे कापू शकतात. अशा स्थितीत पाण्यामुळे नखे खूप मऊ होतात. त्यामुळे नखे कापणे सोपे होते. अशा परिस्थितीत, मुलाला एक खेळणी देणे चांगले आहे. यामुळे तो खेळण्यात व्यस्त राहतो आणि नखे कापणे सोपे होते.

झोपल्यावर नखे ​​कापा

बाळाची झोपेची वेळ ही नखे कापण्यासाठी सर्वोत्तम वेळ असते. झोपेत असताना बाळ हात पाय हलवत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही मुलाची नखे सहज कापू शकता.

फीड करताना नखे ​​कापा :

बाळाची नखे कापण्यासाठी बाळाला फीड करतानाची वेळही चांगली असते. यावेळी बाळ दूध पिण्यात व्यस्त असते आणि त्याचे शरीर जास्त हलत नाही. ज्यामुळे नखे सहज कापता येतात.

या गोष्टी लक्षात ठेवा :

लहान मुलांची नखे कापताना त्या ठिकाणी पुरेसा प्रकाश असेल हे लक्षात ठेवा. तसेच, बाळाची नखे कापण्यासाठी कात्रीऐवजी बेबी नेल क्लिपर वापरा. हे देखील लक्षात ठेवा की मुलाची नखे कापल्यानंतर फाईलरच्या मदतीने नखे हळूवारपणे फाईल करा. जेणेकरून नखांच्या कडा खडबडीत राहणार नाहीत आणि मुलाला दुखापत होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदार कल्याणशेट्टींना मिळणार वाढीव पोलिस बंदोबस्त! जीवे मारण्याच्या धमकीनंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाने मागविला अक्कलकोट उत्तर पोलिसांकडून अहवाल, वाचा...

माझी भूमिका : ‘वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल’

१३ ऑगस्ट २०२६ पंचांग! श्रावणमासाला आजपासून सुरुवात; जाणून घ्या शुभ-अशुभ वेळा

आजचे राशिभविष्य - 13 ऑगस्ट 2026

Green Moong Dal Ladoo: साखर-गूळ नाही तरी चव भन्नाट! असे बनवा हिरव्या मूगडाळीचे प्रोटीनयुक्त लाडू

SCROLL FOR NEXT