Parenting  sakal
लाइफस्टाइल

Parenting Tips: मुलांचं संगोपन करताना 'या' चुका टाळाव्यात; नाहीतर मुलं होतील हट्टी

मुलांचं योग्य पद्धतीनं संगोपन करणं ही सर्वांत मोठी जबाबदारी असते.

Aishwarya Musale

पालक होणं हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मुलाच्या जन्मानंतर जोडप्याच्या जबाबदारीमध्ये वाढ होते. मुलांचं योग्य पद्धतीनं संगोपन करणं ही सर्वांत मोठी जबाबदारी असते. मात्र, मुलांकडून जशा चुका होतात त्याचप्रमाणे पालकांकडून काही चुका होण्याची शक्यता असते. प्रत्येक पालकाची संगोपनाची पद्धत वेगळी असते. 

अनेक वेळा आपल्या लक्षातही येत नाही आणि आपण अशा चुका करतो ज्या आपल्या मुलाच्या चुकीच्या वागण्याचे कारण बनतात. अनेकदा पालकांना हे समजत नाही, पण संगोपन करताना झालेल्या चुकांमुळे मुलं मर्यादेपेक्षा जास्त हट्टी होतात.

पालकांनी मुलांना प्रेमाने शिस्त शिकवणे आवश्यक आहे. मुलांना प्रत्येक परिस्थितीसाठी तयार करा, त्यांच्या वैचारिक आणि मानसिक विकासाकडेही लक्ष द्या. त्यामुळे पालनपोषण करताना खालील चुका करणे टाळावे. 

1. कामात व्यस्त

अनेक वेळा पालक त्यांच्या कामात इतके व्यस्त होतात की त्यांना मुलासाठी वेळ काढता येत नाही. या वेळेची भरपाई करण्यासाठी, ते मुलावर अतिरिक्त पैसे खर्च करतात आणि निरुपयोगी गोष्टी आणतात. मग मुलंही हट्ट करू लागतात.

2. काम देऊ नका

सहसा, पालकांची सर्वात सामान्य चूक म्हणजे त्यांच्या मुलांना कोणतेही काम किंवा जबाबदारी न देणे. तुमच्या मुलांना घरातील कामे शिकवा, त्यांना जबाबदारी द्या, जसे की त्यांची खोली साफ करणे, अंथरून टाकणे, खेळणी उचलणे आणि त्यांना जागेवर ठेवणे इ.

3. प्रत्येक वेळी भेटवस्तू हा उपाय नसतो

तुम्ही मुलांना योग्य वेळी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. मुलांनी काही हट्ट केला किंवा राग आला तर पालक त्यांना खूश करण्यासाठी भेटवस्तू आणतात. प्रत्येक वेळी असे करणे योग्य नाही. सार्वजनिक ठिकाणी रडले तर आपल्या आवडीच्या गोष्टी मिळतील हे मुलांना कळू लागते आणि ते प्रत्येक वेळी हट्ट करू लागतात.

4. मुलांशी मैत्री करा पण शिस्त लावा

मुलांना समजून घेण्यासाठी त्यांचे जवळचे मित्र असणे आवश्यक आहे. मात्र, तुम्ही त्यांचे पालक आहात आणि त्यांनी तुमचा आदर केला पाहिजे, त्यांनी प्रत्येक ज्येष्ठाचा आदर केला पाहिजे, याची आठवण करून देत राहा. सुरुवातीपासून लक्ष दिल्यास नंतर समस्या उद्भवणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT