Parenting  sakal
लाइफस्टाइल

Parenting Tips: बाळांना बिस्किटे खायला देणे योग्य आहे का? जाणून घ्या

भूक लागल्यावर मुलाला बिस्किटे खायला देताय? याचे परिणाम जाणून घ्या

Aishwarya Musale

आपण बाळ जन्मत:च त्याला थेट आपण जो खातो तसा ठोस आहार भरावू शकत नाही. किमान सहा महिने बाळ हे आईच्या दुधावरच अवलंबून असते आणि या काळात त्याला केवळ आईचेच दुधच द्यावे.

नवजात बाळांची काळजी घेणे खूप कठीण असते. मुले स्वत: काही बोलत नाही, त्यामुळे त्यांच्या गरजा ओळखणं थोडं कठीण जातं. जेव्हा मुले सहा महिन्यांपेक्षा जास्त वयातील असतात, तेव्हा त्यांना पुरक आहार देण्यास सुरवात केली पाहिजे.

अशावेळी अनेकजण आपल्या मुलांना बिस्किटं खायला घालतात. बाळाला बिस्किट सहज पचतं आणि चवीला सुद्धा चांगलं असतं त्यामुळे बाळ सुद्धा आरामात ते खातं.

बिस्किटांची टेस्ट मुलांना आवडते ज्यामुळे मुले सहज बिस्कीट खातात. ते गोड आहेत ज्यामुळे मुले त्यांना सहज खाऊ शकतात. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मुलांना सर्व बिस्किटं खायला देणं योग्य नाहीयेय आणि त्यामुळे नुकसानही होऊ शकतं.

बिस्किटांवर प्रक्रिया केली जाते. त्यात अनेक प्रकारचे प्रिजर्वेटिव्‍स वापरले जातात. त्यात रिफाइन्ड व्हाइट फ्लोर, ट्रान्स फॅट्स, अॅडिटिव्ह्ज आणि अनेक सिंथेटिक घटकही वापरले जातात. बिस्किटांमध्ये असलेले घटक मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात.

बिस्किटांमध्ये जास्त प्रमाणात रिफाइंड शुगरचा वापर केला जातो. त्यामध्ये वापरली जाणारी साखर नियमित ग्लूकोजपेक्षा गोड असते, ज्यामुळे मुलांना लठ्ठपणा आणि मधुमेह होण्याची शक्यता असते.

बिस्किटांपासून मुलांना पोषण मिळत नाही. बाजारात विकली जाणारी बिस्किटे मुलांसाठी जंक फूडप्रमाणे काम करतात. हे ऊर्जा प्रदान करते परंतु पोषण देत नाही.

बिस्किटांमध्ये ट्रान्स फॅटचा वापर केला जातो. यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. यामुळे शरीरात चांगल्या आणि वाईट कोलेस्ट्रॉलमध्ये असंतुलन होऊ शकतं.

तुम्ही घरीच मुलांसाठी बिस्किटे बनवू शकता. यामध्ये तुम्ही रागी, बेसन, ओट्स, खजूराचे सरबत, गुड, तूप इ. वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद महामार्गाला कवच; १३ ठिकाणी स्मार्ट कॅमेरे बसवणार, प्रत्येक वाहनावर करडी नजर राहणार

India squad for World Cup 2027: शुभमन गिल-रोहित शर्मा ओपनर; शमी, भुवीचे पुनरागमन! वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी रवी शास्त्रींनी निवडला भारतीय संघ

Live Updates Marathi : लोकआयुक्त कार्यालयातील १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Rautwadi Waterfall Parking Facility : राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी अन् तासनतास वाहतूक कोंडी! 300-400 वाहनांच्या पार्किंगसाठी 'हा' पर्याय उपलब्ध?

Delhi Protest ला Manoj Jarange Patil यांचा पाठिंबा, काय म्हणाले? | Abhijeet Dipke | CJP

SCROLL FOR NEXT