Parenting Tips esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : 'त्याने माझा स्कर्ट ओढला..' किशोरवयीन मुलीसोबत वाईट कृत्य घडल्यावर सुष्मिता सेनने असा शिकवला पालकत्वाचा धडा

Sushmita Sen And Renee Sen : शाळेत ‘तसा’ प्रकार घडल्यावर मुलांसोबत कसं वागावं? सुष्मिताने सांगितलं...

सकाळ डिजिटल टीम

Parenting lessons to learn from Sushmita Sen :

जेव्हा आपली मुलं तीन चार वर्षाची असतात तेव्हा ते आपल्याला दमवतात. पण आपण त्यांना दुर्लक्षित करतो. की जरा मोठी झाल्यावर ती शहाणी होतील. आपलं ऐकतील, पण वय वाढेल तसं मुलं आपल्या हाताबाहेर जायला लागतात. याची काळजी आजकालच्या प्रत्येक पालकाला लागून राहिलेली आहे.

मुलं जशी मोठी होत जातात तशी त्यांना समजून घेण्याची पद्धतही आपण बदलली पाहिजे. अभिनेत्री सुष्मिता सेनची मुलगी रेनेबाबत एक घटना घडली. तेव्हा तिने काय केलं आणि मुलीला कसं समजावलं, हे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.

सुष्मिताने पालकांना काही सल्ले ही दिले आहेत. ते कोणते आणि तिच्या मुली सोबत असं काय घडलं होतं. तिच्या मुलीने शाळेमध्ये एका मुलाला मारले, याबद्दल अधिक माहिती घेऊयात.  

सुष्मिताने नुकतेच रिया चक्रवर्तीला दिलेल्या मुलाखतीत मुलीचा एक किस्सा सांगितला. सुष्मिताने सांगितलं की, मला मुलीच्या शाळेतून फोन आला आणि असं सांगण्यात आलं की तुमच्या मुलीने एका मुलाच्या कानात पेन्सिल घातली आहे. हे ऐकताच मी तडक शाळेकडे गेले. मला आश्चर्य या गोष्टीचा वाटत होतं की माझी मुलगी इतकी रागीट कधीच होत नाही. मग तिने आजच हे पाऊल का उचलले.

या विचारात असताना मी शाळेत पोहोचले आणि तिथे मुलीला समोर बोलावलं. मी जेव्हा मुलीला बाजूला घेऊन विचारलं की, नक्की काय झालं होतं तू अशी का वागलीस. तेव्हा ती म्हणाली की, त्या मुलाने माझ्या स्कर्ट खेचला, मला राग आला आणि म्हणून मी तिथे त्याच्या कानात पेन्सिल घुसवली.

मी तिचे बोलणे शांतपणे ऐकून घेतलं आणि तिला इतकंच म्हणाले की, तू तुझ्या शिक्षकांना याबाबतीत सांगितलंस का?. तेव्हा सुष्मिताच्या मुलीने उत्तर दिलं की, नाही टिचर त्यावेळी बिझी होत्या. त्यामुळे मी त्यांना सांगितलं नाही. पण त्या मुलाने पुन्हा पुन्हा तेच कृत्य केलं आणि तो मला मूर्ख म्हणाला. त्याचा मला राग आला आणि मी त्याला मारायला हात उचलला आणि चुकून माझी पेन्सिल त्याच्या कानात घुसली.

सुष्मिताने पुढे सांगितले की, मी शांतपणे आपल्या मुलीला सांगितलं की त्याला सॉरी म्हण. मुलगी म्हणाली की चूक त्याची सुद्धा आहे. तरीही मी सॉरी का म्हटलं पाहिजे. तेव्हा मी तिला समजावलं की, आधी तू सॉरी म्हण आणि विषय संपव.

तू सॉरी म्हटल्याने लहान होत नाहीस. चूक त्याची ही आहे आणि तुझीही. त्यांने जे केलं ते तू मॅडमला सांगू शकत होतीस. त्याने एखादी गोष्ट केल्यानंतर तू त्याला रिऍक्ट होणं गरजेचं नव्हतं ते तुझं चुकलं.

तो मुलगा तुझा स्कर्ट खेचत होता ते चुकीचं होतं. पण त्याने तुला मूर्ख म्हटल्यानंतर तू त्याला मारणं म्हणजेच मुर्खपणाच आहे. तू मूर्ख आहेस का?  नाहीस, पण तू आता त्याला पेन्सिलने मारून हे सिद्ध केले आहेस की तू मूर्ख आहेस. 

तो मुलगा स्वतंत्र व्यक्ती आहे तो तुला काहीही म्हणू शकतो. पण तू रिऍक्ट करणं हे चुकीचं होतं. म्हणून मी तुला सॉरी म्हणायला सांगितलं.

सुष्मिता सांगते की...

सुष्मिता सेनचा हा सल्ला प्रत्येक पालकाच्या कामी येणारा आहे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना या गोष्टी सांगायला हव्यात. शाळेत जाणाऱ्या मुलांसोबत असे घडते की त्यांना कोणीतरी काहीतरी बोलते. आणि ते चिडतात किंवा भांडण करून मारहाण करतात. केवळ शाळेतच नाही, तर आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात. जेव्हा लोक तुमच्यावर 'तुम्ही असभ्य आहात', 'किंवा आळशी आहात', तुम्ही मूर्ख आहात, 'त्याला काहीच कळत नाही' अशी काही लेबल लावतात.

लोकांच्या या बोलण्यावर आपण चिडून स्वतःसाठी नव्या अडचणी उभ्या करत असतो. अनेक वेळा आपण या गोष्टींवर उघडपणे प्रतिक्रिया देतो किंवा कधी कधी या गोष्टींमुळे आपण दुखावतो. त्यामुळे मुलांना तुम्ही स्वत: ला शांत राहण्याचा सल्ला द्या, असेही सुष्मिताने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

SCROLL FOR NEXT