Parenting Tips Sakal
लाइफस्टाइल

Parenting Tips: मोबाईलचा अतिवापर मुलांच्या वाढीत ठरू शकतो अडथळा, अशी घ्या काळजी

Parenting Tips: मुलांचा खेळण्यासाठी असो वा अभ्यासासाठी, फोनचा वापर वाढत आहे. पण, त्याचा अतिवापर केल्याने मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

Puja Bonkile

सध्याच्या डिजिटल युगात फोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. लहान मुलांच्या हातातही फोन अनेकदा पाहायला मिळतो. मुलांचा खेळण्यासाठी असो वा अभ्यासासाठी, फोनचा वापर वाढत आहे. पण, त्याचा अतिवापर केल्याने मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. हे टाळण्यासाठी काय करावे जाणून घेऊया.

  • शरीरिक विकासात अडथळा

फोनच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये शारीरिक विकासात अडथळा निर्माण होऊन अनेक समस्या निर्माण होतात. पहिली समस्या झोपेची कमतरता आहे. मुले रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन वापरतात तेव्हा त्यांना योग्य वेळी झोप लागत नाही आणि त्यांचे शरीर आणि मन नीट आराम करू शकत नाही. याशिवाय जास्त वेळ स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांमध्ये जळजळ आणि अंधुक दृष्टी येऊ शकते. त्यानंतर सतत बसल्यामुळे त्यांचे स्नायू कडक होतात. या सर्व गोष्टींचा मुलांच्या आरोग्यावर आणि विकासावर परिणाम होतो.

  • मानसिक पिरणाम

मुले जेव्हा जास्तवेळ फोनवर गेम खेळतात किंवा व्हिडिओ पाहतात तेव्हा मानिसक परिणाम होतात. तसेच त्यांची एकाग्रता आणि शिकण्याचा वेग कमी होऊ शकतो. याचा त्यांच्या शालेय अभ्यासावरही विपरीत परिणाम होतो. जेव्हा मुले सतत स्क्रीनकडे पाहतात तेव्हा त्यांचे मन भरकटू लागते आणि ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यामुळे मोबाईलचा वापर मर्यादित ठेवणे गरजेचे आहे.

  • सामाजिक प्रभाव

जेव्हा मुले फोनवर जास्त वेळ घालवतात तेव्हा त्यांचा वास्तविक जगाशी संपर्क तुटतो. यामुळे त्यांना नवीन मित्र बनवण्यात अडचण येऊ शकते. कारण ते लोकांशी मनमोकळे बोलू शकत नाही. संघात काम करणे, संवाद साधणे आणि हुशारीने वागणे यासारखी सामाजिक कौशल्ये देखील कमी होऊ शकतात. त्यामुळे फोनचा वापर कमी करून मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

  • कोणते उपाय करावे

वेळ निश्चित करा

पालकांनी मुलांच्या फोन वापरासाठी वेळ ठरवून तिचे काटेकोरपणे पालन करावे.

शारीरिक क्रियाकलाप वाढवा

मुलांना मैदानी खेळ आणि इतर शारीरिक क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा.

शिकण्याचे पर्यायी मार्ग

मुलांना शिकण्यासाठी इतर संसाधने वापरण्यास प्रोत्साहित करावे. जसे की मुलांना पुस्तके आणि मैदानी खेळ खेरण्यास प्रोत्साहन द्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT