

BMC Bag Scanner Machine
ESakal
दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर मुंबई हाय अलर्ट मोडवर आहे. अनेक ठिकाणी दक्षता वाढवण्यात आली आहे. परंतु देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बीएमसी मुख्यालयात योग्य सुरक्षा व्यवस्था नाही. बीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर बसवलेले बॅग स्कॅनर एक्स-रे मशीन गेल्या दोन महिन्यांपासून खराब झाले आहे. ज्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना बॅगा आणि इतर सामानांची मॅन्युअली तपासणी करावी लागत आहे.