Blog esakal
लाइफस्टाइल

Parenting : 'मुलांना तुमच्यासारखं बनविण्याच्या फंदात पडू नका, तुम्हाला त्यांच्यासारखं होता आलं पाहिजे.’

आईवडिलांचं मुलांशी नातं कसं असावं बरं?

साक्षी राऊत

मुलांसारखं होता आलं तर बघा....

अरविंद शिंगाडे

Parenting Tips : सर, आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची आहे. कधी येऊ भेटायला? पालकांसाठी आयोजित कार्यक्रमानंतर स्टेजजवळ घुटमळणारं एक जोडपं माझ्यासमोर उभं होतं. ‘आमच्या मुलांविषयी खूप काही बोलायचं आहे, काही प्रश्नांची उत्तरं पण जाणून घ्यायची आहेत. त्यामुळे प्लीज आम्हाला वेळ द्या.’ त्यांना होकार देत असताना मी विचार करत होतो, आज आपल्या व्याख्यानातील कोणते मुद्दे त्यांना महत्त्वाचे वाटले असतील? विषय होता, ‘दोन शब्द आई-बाबांसाठी.’

त्या दोघांमधील आई म्हणाली, मुलांच्या बाबतीत आम्ही खूप दक्ष आहोत. आम्ही मुलांसोबत नियमित बोलतो, पण तो संवाद होण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे. मुलांसोबत सातत्याने संवाद ठेवण्याचे महत्व तुमच्या व्याख्यानातून कळले. त्यासाठीच आम्ही तुम्हाला परत भेटू, असे म्हणत ते जोडपं निघून गेलं.

आपल्या मुलांच्या डोळ्यांमधून उज्ज्वल भविष्याची स्वप्नं पाहणारा, बहुतांशी ग्रामीण भागातून नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने खेड्यातून शहरात स्थायिक झालेला हा पालकवर्ग. ‘दोन शब्द आई-बाबांसाठी’ या कार्यक्रमात अंतर्मुख झाल्याची पावती मला मिळाली होती. या कार्यक्रमाची सुरुवात मी खलील जिब्रान यांच्या मुक्तकाच्या स्वैर मराठी अनुवादातील पुढील वाक्यांनी केली होती. ‘तुमची मुलं ही तुमची मुलं नसतात, ती असतात त्यांच्या जीवनाच्या आसक्तीची मुलं. ती तुमच्यामुळे जन्माला येतात पण तुमच्यातून नाही आणि ती तुमच्याजवळ असली तरी तुम्ही मालक नसता त्यांचे’, अशी काहीशी ती विधाने होती.

यातीत एकेक वाक्य समोर बसलेल्या पालकांना वस्तुस्थितीची आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारे होते. ‘पालकांनी सातत्याने मुलांसोबत राहणे’ ह्या एकाच बाबीशी निगडीत अनेक पैलूंवर त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न मी केला होता. पालक घरी, बाहेर मुलांसोबत राहतात पण ते मुलांसोबत असतात का? या प्रश्नातील राहणे आणि असणे यामधला अवकाश संवादाने भरून काढता येतो.

पालक मुलांसोबत आणि मुलं पालकांसोबत राहतात पण हे राहणं आंतरक्रियात्मक असते की केवळ औपचारिक? या प्रश्नावर प्रत्येक पालकाच्या बोलण्यातून आपल्या मुलांबद्दल असणारा कळवळा धो-धो वाहत होता. आम्ही मुलांना भरपूर वेळ देऊ शकत नाही पण ही सर्व धडपड आहे कुणासाठी? त्या मुलांसाठीच. आज आम्ही जे काही करतोय तेही त्यांच्याच उद्यासाठी आहे, अशी सर्वच पालकांची भावना होती, जी लौकिक आहेच.

मुलांचे आयुष्य आपल्यापेक्षा चांगले असावे ही इच्छा सर्व आईवडीलांची असते. पण ‘चांगले’ म्हणजे काय? हा प्रश्न उरतोच. आताच्या काळातील माध्यमांनी व्यापलेले जग, त्यातून सतत होणारा चंगळवादाचा भडिमार आणि पुढे निर्माण झालेली ‘चांगल्या’ आयुष्याची परिभाषा, या सगळ्यांची चिकित्सा करून पालकत्वाची नवीन बैठक तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे . (Lifestyle)

आताची स्मार्ट मुलं आणि त्यांच्या प्रवासातील साक्षीदार असलेल्या पालकांना संवादाशिवाय पर्याय नाही. संवादाच्या संदर्भात चर्चा करताना पालकांकडून संस्कार या गोंडस संकल्पनेच्या अनुषंगाने काही गृहितकांवर विचार झाला पाहिजे. कितीही त्रास झाला तरी मुलांनी इतरांसमोर स्वाभिमान दाखविणे, हा पालकांच्या लेखी संस्कार असतो. पण मुलाच्या अधिकाराचं काय? संवादातून त्यांच्या भावना पालकांनी जाणून घ्यायला नको? याशिवाय न सांगता समजलं पाहिजे, असा अट्टहास हाही संवादामधील अडथळाच. (Parenting Tips)

मुलांसोबत पालकांचा हा संवाद मैत्रीपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी मुलांना ‘स्पेस’ देणे, ही आत्ताची सर्वात मोठी गरज आहे. मी माझ्या आईबाबांसोबत सहज बोलू शकतो, हे मुलांसाठी अभिमानास्पद असते. ज्या पालकांना मुलांइतकं लहान होता येते, त्यांचा मुलांशी संवाद तितकाच सुक्ष्म होतो. इतर वेळी ते फक्त बोलणं ठरते. परत खलील जिब्रान म्हणतो तसंच, ‘तुम्ही मुलांना तुमच्यासारखं बनविण्याच्या फंदात पडू नका, तुम्हाला त्यांच्यासारखं होता आलं पाहिजे.’

शिक्षक, समुपदेशक, खामगाव जि. बुलडाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT