parle kismi google
लाइफस्टाइल

Chocolate Day : पॉकेटमनी न मिळण्याच्या काळात चार आण्याच्या 'किसमी'ने मुलांचं पोट आणि मनही भरायचं

ज्या काळात बिस्किटे, चॉकलेट्स आणि गोळ्या फक्त इंग्रजांच्या कारखान्यात बनवल्या जात होत्या त्या काळात चौहान कुटुंबाने भारतात बिस्किटांचा कारखाना सुरू केला.

नमिता धुरी

मुंबई : किस काय असतं हे कळण्याचं ते वय नव्हतं आणि त्या वयात किस कळावं असा तो काळही नव्हता; पण तरीही पार्लेचं किसमी लहान मुलांमध्ये जबरदस्त लोकप्रियता मिळवत गेलं.

स्वदेशी चळवळीतून सुरू झालेल्या पार्ले कंपनी बिस्किटे, चॉकलेट्स आणि गोळ्या भारतात तयार करण्यास सुरूवात केली. पुढे या कंपनीने यशाची जी नवनवीन शिखरं गाठली त्यातीलच एक म्हणजेच किसमी चॉकलेट.

ज्या काळात बिस्किटे, चॉकलेट्स आणि गोळ्या फक्त इंग्रजांच्या कारखान्यात बनवल्या जात होत्या त्या काळात चौहान कुटुंबाने भारतात बिस्किटांचा कारखाना सुरू केला. या कारखान्यातून बाहेर पडणारं पार्ले-जी बिस्कीट प्रचंड लोकप्रिय झालं.

या कंपनीचं दुसरं उत्पादन म्हणजे किसमी चॉकलेट. या चॉकलेटच्या आवरणावर एक मुलगा आणि मुलगी एकमेकांना किस करताहेत असं चित्र असायचं.

पण यात वावगं वाटावं असं काहीच नव्हतं. कारण त्या चित्रापेक्षा आवरणाच्या आतील चॉकलेटवरच मुलांचं जास्त लक्ष असायचं. साखरेचा पाक आणि वेलचीपासून तयार होणारं हे चॉकलेट आर्थिकदृष्ट्याही सोयीचं होतं.

त्या काळातल्या मुलांना पॉकेटमनी वगैरे मिळत नव्हता. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या पाहुण्याने हातावर टेकवलेला एक रुपया किसमीसाठी पुरेसा असायचा.

१ रुपयाला ४ चॉकलेटं मिळायची. २ रुपयांचा किसमी बारही मिळायचा. या चॉकलेटांनी मुलांचं पोट भरायचं आणि मनही.

काळानुसार प्रत्येक कंपनी आपल्या उत्पादनात काही ना काही बदल करत असते. यानुसार पार्लेनेही किसमीची किंमत वाढवून एक रुपया केली. आता या किसमीमध्ये रोझमिल्क, राजभोग, मिठा पान, कुल्फी असे फ्लेवर्सही उपलब्ध झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctor killed in Tilari : आंध्रप्रदेशातील डॉक्टरचा तिलारीच्या जंगलात खून! दरीत मोटार फेकली; खुनामागचं कारण...

AUS vs IND: रोहित...कोहली... चाहत्यांचा जयघोष! सिडनी वनडेपूर्वी अन् नंतर कसं होतं संपूर्ण वातावरण, BCCI ने शेअर केला Video

Latest Marathi News Live Update : मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोरच राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाची चव्हाट्यावर

अप्पीला मिळाला तिचा रियल लाईफ अर्जुन ! आज पार पडला साखरपुडा; निवेदिता सराफांची खास हजेरी

रील्स प्रेमींसाठी खुशखबर! Instagram ने लॉन्च केलं मजेदार फीचर, आधी बघितलेली कोणतीही रील सेकंदात सापडणार, काय आहे Watch History सेटिंग?

SCROLL FOR NEXT