Health  sakal
लाइफस्टाइल

Health Care News: या योगासनांमुळे रक्ताभिसरणाची प्रकिया राहते सुरळीत, जाणून घ्या

योगासनांमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.

Aishwarya Musale

वर्कआउट्सकडे दुर्लक्ष करणे, जेवणात पोषक तत्वांचा अभाव आणि तासनतास एकाच जागी बसून काम करणे यामुळे बहुतेक लोकांना उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या समस्या त्रास देतात. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण बिघडू लागते. 

अशाच एका आसनाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमची पाठ, कंबरदुखीही दूर होईल आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशनही सुरळीत होईल. तेव्हा जाणून घेऊया या आसनाबाबत सविस्तर.

पार्श्वकोनासन हे दंडस्थितीमधील आसन आहे

असे करावे आसन

प्रथम ताठ उभे राहावे. त्यानंतर दोन्ही पायात साधारण अडीच ते तीन फुटांचे अंतर घ्यावे. (उंचीनुसार कमी-जास्त अंतर घेणे.)

दोन्ही हात बाजूने खांद्याच्या रेषेत जमिनीला समांतर येतील एवढेच वर घ्यावे.

नंतर उजवे पाऊल उजव्या बाजूला वळवावे. उजवा पाय गुडघ्यात वाकवून साधारण मांडी व पोटरीमध्ये काटकोन असेल असे बघावे. उजवी मांडी जमिनीला समांतर असावी.

उजवा गुडघा घोट्याच्या पुढे जाणार नाही ही काळजी घ्यावी.

हळू हळू कमरेतून उजव्या बाजूला वाकावे आणि उजव्या हाताचा तळवा उजव्या पावलाच्या मागच्या किंवा पुढच्या बाजूला जमिनीवर टेकवावा.

आसनाचे फायदे

या आसनाच्या नियमित सरावाने कंबरेला, पायाला, खांदा व हातात उत्तम ताण बसतो. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

तेथील स्नायूंची लवचिकता व ताकद वाढते.

शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. वात कमी होतो.

फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढल्याने अस्थमा, बालदमा, श्वसनाचे त्रास कमी होण्यास मदत होते.

तेव्हा हे आसन नियमित करा आणि तुमच्या शरीरातील फरक स्वत: जाणवा. तुम्हाला हे आसन केल्याने फार फ्रेश वाटेल आणि तुमचा संपूर्ण दिवस अगदी उत्स्फुर्त राहील. आसनाने बऱ्याच आरोग्यविषयक समस्या दूर होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT