Paytm travel festival google
लाइफस्टाइल

Paytm travel festival : विमान प्रवासावर मिळवा भरघोस सवलत; फक्त दोन दिवस बाकी

पेटीएम देशातील २५०० हून अधिक बस ऑपरेटरच्या माध्यमातून तिकीट सेवा उपलब्ध करते.

नमिता धुरी

मुंबई : स्वस्त दरात विमान प्रवास करण्याची सुवर्णसंधी देशातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा देणारी कंपनी पेटीएमने आणली आहे. पेटीएमने २१ ते २३ जुलै दरम्यान ट्रॅव्हल फेस्टिव्हल सेलचे आयोजन केले असून त्याद्वारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी इंडिगो, विस्तारा, स्पाइसजेट, गोएअर आणि एअर एशियाच्या विमान तिकीटावर अनुक्रमे १५ आणि १० टक्के सूट मिळणार आहे. (Paytm travel festival)

दरम्यान कंपनीद्वारे विशेष कॅशबॅक ऑफरचीही सवलत देण्यात आली आहे. केवळ विमान प्रवासासाठीच नव्हे तर अॅपद्वारे बस तिकिटाच्या नोंदणीवरही कंपनीने आकर्षक ऑफर आणली आहे. सशस्त्र दल, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अतिरीक्त सवलतींसह विशेष भाडे सवलतदेखील आहे. एचएसबीसी कार्ड वापरकर्त्यांनाही ही सवलत मिळू शकते.

पेटीएम अॅपवरून बुक केलेल्या प्रत्येक बस तिकिटावर कॅशबॅकसह आकर्षक सवलत मिळणार आहे. पेटीएम देशातील २५०० हून अधिक बस ऑपरेटरच्या माध्यमातून तिकीट सेवा उपलब्ध करते.

ग्राहकांनी बसचे तिकीट नोंदणी करताना १५ रुपये भरून बस कॅन्सलेशन प्रोटेक्शन घेतले तर त्यांना त्यांच्या तिकीटावर १०० टक्के परतावाही मिळू शकतो. पहिल्यांदाच या अॅपद्वारे बस तिकीट घेत असल्यास २० टक्के कॅशबॅकचा लाभ मिळू शकतो.

पेटीएम आपल्या वापरकर्त्यांना आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे, हॉटेल्स, शहरांतर्गत बस आणि रेल्वे तिकिटांची नोंदणी सुविधा देते. कंपनीची सर्व प्रमुख देशांतर्गत विमान कंपन्यांशी भागीदारी असून ती आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना मान्यताप्राप्त ट्रॅव्हल एजंटही आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही छुप्या खर्चाशिवाय किंवा अतिरिक्त शुल्काशिवाय सवलतीच्या दराचा लाभ मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT