Pet Care Tips esakal
लाइफस्टाइल

Pet Care Tips : घरी पाळीव प्राणी आणताय? या गोष्टींची घ्या काळजी

अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

तुम्ही घरी कुत्रा, मांजर, पोपट किंवा इतर कोणताही पाळीव प्राणी आणण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी त्यांच्या जातीवर (ब्रीड) लक्ष केंद्रित न करता त्यांचे खाणेपिणे, राहण्याची व्यवस्था, वेळोवेळी आवश्यक तपासणी अशा इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. या गोष्टी पाहून आपण आपल्या पाळीव प्राण्यांना निरोगी वातावरण देऊ शकता, जेणेकरून ते दीर्घकाळापर्यंत आजारांपासून दूर राहू शकतील. तर मग काय आहेत या महत्त्वाच्या टिप्स, ते जाणून घेऊयात.

जातीनुसार त्यांचे अन्न असायला हवे-

जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर, पामरिअन्स, बुल डॉग्स जी काही जातीचे पाळीव प्राणी घरी आणत असाल, तर त्या जातीविषयी सर्वप्रथम नीट माहिती करून घ्या. कारण आकारानुसार त्यांना राहण्याची व्यवस्था करावी लागते.त्यांचे खाणंपिणंही जातीवर अवलंबून असते. एक लहान मूल आहे असा विचार करून काहीही खाऊ देऊ नका, कारण यामुळे त्यांना एलर्जी आणि इतर समस्या उद्भवू शकतात.याबाबत संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम.

पेपर वर्क पूर्ण करा-

तुमच्याकडे कुत्रा किंवा तुम्ही जे काही प्राणी पाळत आहात, त्याबद्दल सर्व डिटेल्स असणे आवश्यक आहे. जसे की,त्याची जात, कौटुंबिक इतिहास, लसीकरण, कृमिनाशक वेळापत्रक इत्यादी. ही माहिती एखाद्या आजाराच्या वेळी त्यांचे वर्तन समजून घेण्याव्यतिरिक्त खूप उपयुक्त ठरते.

सांभाळण्याची पद्धत-

संबंधित डॉक्टरचे सर्व तपशील आपल्या आजूबाजूला ठेवा जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत जास्त त्रास होणार नाही.त्यांच्या संबंधित चेकअपची आवश्यक ती सर्व यंत्रे तेथे उपस्थित असावीत. कुत्र्याला आंघोळ घालणे, त्यांची नखे कापण्याचे काम एखाद्या व्यावसायिकाकडून करून घेणे चांगले. याशिवाय, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक असणे ही देखील एक आवश्यक स्टेप आहे. यामुळे पाळीव प्राण्यांचे आपल्याशी असलेलं बॉण्डिंग तर चांगलं होतंच,पण त्यांच्यामुळे इतरांसमोरही वेगळ वाटणार नाही.

प्राण्यांची कम्युनिटी ज्वॉइन करा -

तुम्ही घरात आणत असलेल्या पाळीव प्राण्यांच्या प्रकाराशी संबंधित कम्युनिटीमध्ये निश्चितपणे सहभागी होणे आवश्यक आहे. हे महत्वाचे आहे कारण अशा गटात, प्राण्यांशी संबंधित अनेक प्रकारची माहिती आणि ट्रेंड शेअर केले जातात, जे आपल्याला त्यांचे वर्तन समजण्यास मदत करतात आणि त्यांना अधिक चांगल्या प्रकारे वागवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT