लाइफस्टाइल

पिंपल्स आणि फोड यांच्यातील फरक माहित आहे का?

पिंपल्स आणि फोड यांच्यातील फरक ओळखण्यास करु नका चूक

शर्वरी जोशी

सध्याच्या काळात आपण सारेच जण फास्टफूडच्या आहारी गेलो आहोत. त्यामुळे सतत मैदा, तेलकट, मसालेदार पदार्थ खाऊन त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. सहाजिकच त्यामुळे मग लहानसहान शारीरिक तक्रारी डोकं वर काढू लागतात. यामध्येच खासकरुन तरुणांमध्ये जाणवणारी समस्या म्हणजे पिंपल्स. अनेक जण आज पिंपल्स, फोड यासारख्या त्वचेच्या समस्येने त्रस्त आहेत. मात्र, अनेक जण पिंपल्स आणि फोड यांच्यात गल्लत करतात. चेहऱ्यावर येणाऱ्या पुरळांच्या या दोन्ही प्रकाराला लोक एकच असल्याचं समजतात. परंतु, हे दोन्ही प्रकार वेगळे असून पिंपल्स व फोड यातील फरक काय ते आज आपण जाणून घेऊयात. (pimples-prevention-boils-vs-pimples-signs-causes-prevention-tips)

पिंपल्स म्हणजे काय?

आपल्या त्वचेवर लहान लहान रंध्रे असतात. या रंध्रांमधून प्रत्येकवेळी तेल बाहेर पडत असतं. तेल बाहेर येत असतांना रंध्रे ओपन झालेली असतात. त्यामुळे या रंध्रांमध्ये हवेतील धूळ, घाण आणि बॅक्टेरिया अडकून बसते. रंध्रांमध्ये एकदा घाण व बॅक्टेरिया अडकला कि त्यानंतर त्वचेवर पिंपल्स किंवा मुरुम येतात. हे पिंपल्स लालसर पिवळ्या रंगाचे असतात. यातून अनेकदा पू देखील येतो. विशेष म्हणजे अनेकदा पिंपल्स आल्यानंतर चेहऱ्यावर काळे डाग पडतात व ते कायमस्वरुपी राहतात.

पिंपल्स येण्याची कारणे-

पिंपल्स कोणत्याही वयात येऊ शकतात. बहुतांश वेळा तारुण्यावस्थेत येतात. त्यामुळे पिंपल्स येण्यामागची कारणं कोणती पाहुयात.

१. हार्मोनल बदल होणं

२. तेलकट, मसालेदार पदार्थांचं सेवन

३. गर्भावस्थेतील बदल

४.गर्भनिरोधक गोळ्याचे अतिप्रमाणात सेवन

फोड म्हणजे काय?

फोड शरीराच्या कोणत्याही भागावर येऊ शकतात. पिंपल्स आकाराने लहान असतात. तर फोड मोठे असतात. एखाद्या गाठीसारखं यांचं स्वरुप असतं आणि ते प्रचंड दुखतात. अनेक वेळा शरीरावर एखादी सूज असेल तर त्यावेळीदेखील फोड येतो. यात फोड आलेल्या ठिकाणाजवळील भाग लाल होतो. साधारणपणे हे फोड मान, मांड्या, चेहरा, अंडरआर्म्स यांसारख्या ठिकाणी येतात.

फोड येण्यामागची कारणे -

१. उष्ण पदार्थांचं सेवन

२. सतत घाम येणे.

३. शारीरिक स्वच्छता न बाळगणे.

४. शरीरात जास्त उष्णता असणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir: काश्मीरच्या कुलगाममध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; मजुरांवर दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या तरुणाचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीला हजेरी, घरी जाताच घेतली ४५ लाखांची लाच; बीडमध्ये विभागीय वनअधिकाऱ्यांला रंगेहात पकडलं

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

MBBS Bond: एमबीबीएस डॉक्टरांचा ‘बॉण्ड’ अखेर रद्द! राज्य शासनाचा मोठा निर्णय; वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे धोरणात बदल

Dhom Dam: वाईत धोक्याची घंटा! धोम धरणाचा विसर्ग वाढला; महागणपती मंदिरात घुसले पुराचे पाणी

SCROLL FOR NEXT