pitru paksh esakal
लाइफस्टाइल

पितृपक्ष : श्राद्ध व तिथीचे महत्त्व; ज्योतिषाचार्य सांगतात

सकाळ डिजिटल टीम

(नरेंद्र धारणे - लेखक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

पितृपक्ष २१ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. हा पितरांना प्रसन्न करण्याचा काळ असून, या काळात पितृ पंधरवडा पाळण्यासह श्राद्धविधी, दानधर्म, गरीब विद्यार्थ्यांना मदत, वृद्धाश्रमात जाऊन भोजन करून सामाजिक बांधिलकी जपायला हवी. पितृपक्षासंदर्भात अनेकांच्या मनात वेगवेगळ्या शंका असतात. त्याविषयी...



१. घरात/कुळात चालू वर्षात मृत झाले असल्यास महालय श्राद्ध करता येते का?
नाही. मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही.

२. घरात/कुळात सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे?
सवाष्ण व्यक्ती मृत होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात ‘अविधवा नवमी’ (भाद्रपद कृष्ण नवमी) या दिवशी श्राद्ध करता येते.

३. ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात?
पंचमी, अष्टमी, द्वादशी किंवा सर्वपित्री अमावस्येला घालतात.



४. ज्यांचा मृत्यू घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे?
शस्त्रदहित श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस घालावे.

५. संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे?
अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात.

६. पितरांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे?
भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या (सर्वपित्री अमावस्या) या दिवशी सर्व पितरांचे (ज्ञात-अज्ञात) श्राद्ध घालता येते. तसेच ब्राह्मणास हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधादान द्यावे.

७. श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल कसे घालावे?
पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे.

८. अघोर पितरांच्या सद्‍गतीसाठी कोणती सेवा करावी?
पितृस्तुती, बाह्यशांती सूक्त, पितरतुष्टीकारक स्तोत्र वाचावे, तसेच दुपारी बाराला एका पोळीवर थोडा भात, तूप, पाच-सात काळे तीळ घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून एक माळ जप करून अंती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करणे. यामुळे अघोर पितरांनादेखील सद्‍गती लाभते.
मध्व: सोमास्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम।
बहिर्ष्मती रातीर्वीश्रिता गिरीषा यांत नासत्योप वाजै:।।



९. मातामह श्राद्ध म्हणजे काय? त्याचा अधिकार कोणाला असतो?
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध (दौहित्र) असते. ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा (आईचे वडील) जिवंत नाहीत अशा मुलांनाच दौहित्राचा अधिकार असतो. ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी आजोबा गेल्यावर एक वर्षाने दौहित्र करण्यास सुरवात करावी. स्वत:चे वडील गेल्यास दौहित्र करू नये. दौहित्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो. हे दौहित्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट होय. नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही.

१०. पितृपक्षात पारायण करता येते का?
हो. पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते (गुरुचरित्र/नवनाथ/भागवत/श्रीपाद चरित्र इत्यादी). पितृपक्षात केलेले पारायण पितरांना संतोषकारक असते.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT