Pitru Paksha 2024 Sakal
लाइफस्टाइल

Pitru Paksha 2024: पितृ पक्षाच्या 15 दिवसांमध्ये नकळत केलेल्या चुका पडू शकतात महागात, 'या' गोष्टींची घ्या काळजी

Pitru paksha 2024: पितृपक्षात १५ दिवसांमध्ये काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे पितर नाराज होणार नाही.

Puja Bonkile

Pitru Paksha 2024: हिंदू धर्मात 15 दिवसांच्या पितृ पक्षाला खुप महत्व आहे. या दिवसांमध्ये पितर पृथ्वीवर येतात आणि सर्वपित्री अमावस्येला पितृलोकात परत जातात. या दिवसांमध्ये पितरांची आठवण रून त्यांचे श्राद्ध, तर्पण अर्पण केल्याने पितृदोषातून मुक्ती होते अशी मान्यता आहे.

यंदा पितृ पक्ष 17 सप्टेंबरपासून म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू झाले असून 2 ऑक्टोबर पितृपक्ष संपणार आहे. जर तुमचे पूर्वज प्रसन्न असतील तर घरात कोणतेही संकट किंवा आर्थिक समस्या येत नाहीत. पितृपक्षात नकळत पुढील चुका करू नका ज्यामुळे पितर नाराज होतील.

पितृ पक्षाच्या कोणत्या नियमांचे पालन करावे

  • पिृतपक्षात १५ दिवस कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न खाऊ नका.

  • या दिवसांमध्ये ब्रम्हचर्य पाळावे, कारण पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्याच्या घरीही जातात.

  • या काळात नवीन कपडे, शूज आणि मेकअपच्या वस्तू, सोने आणि चांदी यासारख्या गोष्टी खरेदी करू नका.

  • या काळात नविन घरात गृहप्रवेश करणे टाळावे.

  • पितृ पक्षात मद्यपान आणि धुम्रपान करणे टाळावे.

  • पितृपक्षात ज्योतिर्लिंगासारख्या प्रमुख मंदिरांना आणि इतर आध्यात्मिक ठिकाणी जाणे टाळावे.

  • या दिवसांमध्ये दागिने खरेदी करणे टाळावे.

  • केस, नखे कापणे आणि मुंडण करणे देखील अशुभ मानले जाते.

  • पितृ पक्षात साक्षगंध आणि विवाह यांसारख्या कोणत्याही शुभ कार्यक्रमाचे आयोजन करणे अशुभ मानले जाते.

  • यामध्ये नवीन व्यवसाय किंवा नवीन नोकरी सुरू करणे टाळावे.

  • घरातील सदस्यांना जेवणात तीन चपात्या देऊ नका. यामुळे पितर त्या लोकांना सोबत घेऊन जाऊ शकतात.

पितृ पक्षाचे महत्व

आपल्या पिढ्यांमध्ये जर कोणची इच्छा अपुर्ण राहिली असेल तर त्याचा त्रास आताच्या पिढीला होऊ शकतो. हा पितृदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यापैकी एक म्हणजे पितरांची शांती करणे होय. पितरांसाठी हे उपाय १५ दिवस केले जातात अशी मान्यता आहे. त्यामुळेच या दिवसांमध्ये पितरांची शांती करण्याकडे लोकांचा जास्त कल असतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT