Pitru Paksha 2024 :  Sakal
लाइफस्टाइल

Pitru Paksha 2024 : पितरांचे श्राद्ध न करणाऱ्यांनी राहावे सावध! तुम्हाला 'या' गंभीर समस्यांना जावे लागू शकते सामोरे

Pitru Paksha 2024 : पितृपक्षात श्राद्ध न केल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Puja Bonkile

Pitru Paksha 2024 : पितृपक्षाला सुरूवात झाली आहे. या दिवसांमध्ये काही गोष्टी काळजी घेणे गरजेचे असते. तसेच अनेक लोक पितृपक्षात पुर्वजींची आठवण काढून श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करतात.

या काळात पितर जमिनीवर येतात अशी मान्यता आहे. पितर संतुष्ट असेल तर आपल्यावर कायम कृपादृष्टी ठेवतात. पण नाराज असल्यास नकारात्मक परिणाम दिसतात.

पितृ पक्षादरम्यान, पितरांना त्यांच्या वंशजांकडून आशा असते की ते त्यांचे श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करतील आणि या आशेने पितृ पक्ष अश्विन महिन्यात पितृपक्षात पृथ्वीवर येतात. तुम्ही जर श्राद्ध केले नाही तर पितर नाराज होतात. याचे कोणते नकारात्मक परिणाम होतात हे जाणून घेऊया.

पुढील नकारात्मक गोष्टींना सामोरे जावे लागते

पितृदोष लागतो

पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्यास पितृदोषाला सामोरे जावे लागते. कारण श्राद्ध-तर्पण, पिंडदान न केल्याने पितर नाराज होतात आणि आपल्या मुलांना त्रास देतात.

येणाऱ्या पिढ्यांवर दुष्परिणाम

पितृ पक्षात श्राद्ध न केल्याने केवळ तुमच्या आयुष्यावरच नाही तर तुमच्या मुलांवरही वाईट परिणाम होतो. इतकेच नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांनाही याचा त्रास होतो

शुभ कार्य पार पडत नाही

मार्कंडेय पुराणानुसार जे लोक श्राद्ध करत नाही. त्यांना दीर्घायुषी निरोगी मुले जन्माला येत नाहीत तसेच अशा लोकांच्या घरी कोणतेही शुभ कार्य पार पडत नाही.

मुलांना त्रास होतो

तसेच जे पितरांचे श्राद्ध किंवा तर्पण करत नाहीत ते नेहमी कोणतीही चूक न करता खोट्या आरोपात अडकतात. यामुळे त्यांना आयुष्यभर अपमान सहन करावा लागतो. अशा लोकांना समाजात कधीच मान मिळत नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT