लाइफस्टाइल

पोलिस असावा तर असा! आजीबाईंची केलेली मदत पाहून तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है!

शर्वरी जोशी

नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस कायमच त्यांच्या सक्षम खांद्यावर पेलत असतात. समाजात कुठेही काही अनुचित किंवा गुन्हे घडत असतील तर पोलिस  नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असतात. विशेष म्हणजे केवळ नागरिकांची सुरक्षाच नव्हे तर त्यांच्या अडीअडचणीच्या वेळीदेखील पोलिस धावून जातात. आजवर सोशल मीडियावर पोलिसांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यात उत्तम गाणारे पोलिस, नागरिकांना मदत करणारे किंवा असे असंख्य पोलिस त्यांच्यातील गुणांमुळे चर्चेत आले आहेत. यामध्येच सध्या तामिळनाडूतील एका पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे एका आजींना त्यांची हरवलेली औषधे देण्यासाठी या पोलिसांनी जी शक्कल लढवली तिची दाद सगळ्यांनी दिली पाहिजे.

साधारणपणे हॅल्मेट न घातल्यास, गाडी वेगाने किंवा मद्यपान करुन चावल्यास, नियमांचं उल्लंघन केल्यास पोलिस वाहनचालकांना रस्त्यात आडवतात हे साऱ्यांनीच पाहिलं आहे. मात्र, तामिनाडूमध्ये एका पोलिसांनी वाहनचालकाला त्याची कोणतीही चूक नसतांना वाटेत अडवल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या पोलिसांनी ज्या कारणासाठी असं  केलं, ते ऐकल्यानंतर अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. 

तामिळनाडूमधील एका पोलिसाने बाईकवरुन जाणाऱ्या एका २४ वर्षीय युवकाला वाटेत अडवलं आणि तू तेनकासी मार्गाने चालला आहेस का असा प्रश्न विचारला. यावर युवकाने हो असं उत्तर दिलं. त्यानंतर या पोलिसांनी युवकाच्या हातात औषधाची एक बाटली दिली आणि या मार्गाने गेलेल्या एका बसमधील आजींची ही बाटली असून त्यांना ती दे असं सांगितलं. बसमधून जातांना या आजींची औषधाची बाटली वाटेत पडली होती. त्यामुळे त्यांच्यापर्यंत ती पोहोचावी यासाठी या पोलिसांनी युवकाला वाटेत अडवलं. विशेष म्हणजे या युवकानेही क्षणाचा विचार न करता तात्काळ होकार दिला आणि बसचा पाठलाग करत या आजींना औषधाची बाटली दिली.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ अन्नी अरूण यांनी युट्यूबवर शेअर केला असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आतापर्यंत जवळपास ३ लाखांपेक्षा जास्त जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : ४ कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

SCROLL FOR NEXT