pores problem on face decreases beautiness of face of women in kolhapur 
लाइफस्टाइल

चेहऱ्यावरील ओपन पोर्सची समस्या आहे? घरीच तयार करा Night Skin Serum

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : प्रत्येक महिलेला मुलायम आणि सुंदर त्वचा हवी असते. परंतु प्रदूषण, धूळ, माती, ऊन यांच्या संपर्कात आल्याने त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्वचेवर पोर्स होणे ही सर्वात मोठी समस्या आहे. बऱ्याच वेळा पोर्स इतके जास्त होतात की त्वचा खरमरीत दिसायला लागते. आणि अशा त्वचेमुळे सौंदर्य गमावल्यासारखे वाटते. ज्यामुळे सुंदरता कमी होते. बऱ्याच महिला हे लपवण्यासाठी अनेक उपाय करतात. मेकअप करून हे लपवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु मेकअप नंतर ते पोर्स पुन्हा दिसतात. परंतु आता काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला एक नाईट सिरम कसे तयार करावे याविषयी माहिती देणार आहोत. ज्याला तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करून तुमच्या चेहऱ्यावरील पोर्सला लावू शकता. यामध्ये एक गोष्ट उत्तम आहे, की हे तयार करताना लागणाऱ्या गोष्टी या तुमच्या किचनमध्येच उपलब्ध आहेत. ज्याचे रिझल्ट उत्तम असून कोणताही साईड इफेक्ट होत नाही.

ओपन पोर्स नाईट सिरम बनवण्याची पद्धत 

प्रथम एक बाउल घेऊन त्यामध्ये कॉपी आणि एलोवेरा जेल एकत्र करा. नंतर यामध्ये गुलाबजल आणि विटामिनची एक कॅप्सूल टाका. आणि हे सर्व मिश्रण एकत्र करा. तुमचा नाईट सिरम तयार आहे. आता याला तुम्ही नाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता.

ओपन पोर्स नाईट सिरमचा वापर कसा करावा

रात्री झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. याला तुमच्या चेहऱ्यावर लावून थोडा वेळ मसाज करा. ते रात्रीभर तसेच चेहऱ्याला लावून ठेवा आणि सकाळी उठून चेहरा स्वच्छ करा. याच्या वापरामुळे काही दिवसांतच तुम्हाला याचे रिझल्ट मिळतील.

याचाच वापर का ?

विटामिनला ब्युटी विटामिन असेही म्हंटले जाते. यामध्ये एॅटीऑक्सीडेंट आणि anti-inflamatory चे गुण असतात जे त्वचेशी निगडित अनेक समस्यांना दूर ठेवतात. विटामिन E तेल रोज वापरल्याने त्वचा काही दिवसात हेल्दी आणि शायनी दिसायला लागते. परंतु हे तेल थेट चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्याचा रंग लाल होतो. यामुळे ते लावण्याआधी त्याचा वेगवेगळे टेस्ट करून जरूर पहा.

(वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८० लाख पॅकेजची नोकरी AIमुळे गेली, IT इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं; शेवटची चिठ्ठी वाचून पत्नीनेही १८व्या मजल्यावरून मारली उडी

Kurla Accident: कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आरोपी बेस्ट बसचालकला अखेर जामीन; हायकोर्टाचा निर्णय

Team India Schedule: भारतीय संघ व्यस्तच राहणार...! इंग्लंड दौऱ्यानंतर या देशात टी२० मालिका खेळणार; BCCI कडून घोषणा

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला ९ कोटींचा फटका... राजस्थान रॉयल्सच्या 'Deal' शी आहे कनेक्शन; जाणून घ्या सर्व प्रकरण

"दारूमुळे माझं पहिलं लग्न मोडलं" जावेद अख्तरांची कबुली ; "मी एका वेळेला 18 बियर.."

SCROLL FOR NEXT